तलवारीसह दोघे पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 01:05 IST2018-10-11T01:05:10+5:302018-10-11T01:05:29+5:30

शहरातील अतिथी ढाब्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी छापा मारत एक तलवार जप्त केली असून, दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेजराव धोंडीबा बनसोडे (४७, रा. शिवाजीनगर), संदीप देवीदास झोटे (३०, रा. सावंगी टेकाळे ता. देऊळगाव राजा) अशी आरोपींची नावे आहेत.

Both of them along with the sword are in police custody | तलवारीसह दोघे पोलिसांच्या ताब्यात

तलवारीसह दोघे पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील अतिथी ढाब्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी छापा मारत एक तलवार जप्त केली असून, दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेजराव धोंडीबा बनसोडे (४७, रा. शिवाजीनगर), संदीप देवीदास झोटे (३०, रा. सावंगी टेकाळे ता. देऊळगाव राजा) अशी आरोपींची नावे आहेत.
मागील काही दिवसांपासून शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील अंबड रोड वरील अतिथी ढाब्याची पोलिसांनी बुधवारी तपासणी केली. तेथे पोलिसांना एक तलवार आढळून आली असून, ही तलवार जप्त करण्यात आली आहे. ढाब्याचा मालक तेजराव बनसोडे व व्यस्थापक संदीप झोटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक राहुल गायकवाड, पोनि. राजेंद्रसिह गौर, पोउनि. शेख रज्जाक, पोहेकॉ. संतोष सावंत, रंजित वैराळ, पोका. सदाशिव राठोड आदींनी केली.

Web Title: Both of them along with the sword are in police custody