शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

बोगस शिक्षक भरतीचे रॅकेट; गांभीर्याने सखोल तपास व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 00:48 IST

वेगवेगळ्या संस्थेत शिक्षकाची नोकरी लावून देण्यासाठी लाखो रूपयांची मागणी करणाऱ्या संशयित आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वेगवेगळ्या संस्थेत शिक्षकाचीनोकरी लावून देण्यासाठी लाखो रूपयांची मागणी करणाऱ्या संशयित आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असतांना ज्या गंभीरतेने पोलिसांकडून या रॅकेटचा पर्दाफाश होणे अपेक्षित होते, तसे न झाल्याने आरोपींची हिंमत वाढली आहे. हा तपास उच्च पदावरील अधिकाऱ्यांकडे दिल्यास त्यातून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे निवेदन फसवणूक झालेल्या गणेश रामकिसन वाघ यांनी सोमवारी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.या निवेदनात वाघ यांनी म्हटले आहे की, औरंंगाबाद जिल्ह्यातील विविध संस्थांमध्ये शिक्षकाचीनोकरी लावून देतो म्हणून संशयित आरोपी महेश उर्फ गणेश सुनील पालवे यांच्या विरूध्द जालना येथील सदरबाजार पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. या गंभीर प्रकरणाचा तपास हा एका जमादाराकडे सोपविण्यात आला. संबंधित प्रकरणात पालवेला अटकही करण्यात आली, परंतु नंतर त्याचा जामीन होऊन सध्या बिनधास्तपणे वावरत आहे. त्याने व त्याच्या अन्य पाच ते सहा सहकाºयांनी मिळून डीएड आणि बीएड झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून लोखो रूपये उखळले आहेत.हे लाखो रूपये घेऊनही गणेश वाघ यांना बनावट रूजू आदेश देण्यासह जिल्हा परिषदेतून अ‍ॅपू्रव्हल मिळून देण्याचे प्रकारही पुढे आले आहे.माझ्या सारखे जवळपास शंभरपेक्षा अधिक शिक्षक हे पालवे यांच्या आमिषाला बळी पडले असावेत, हा सर्व व्यवहार कोट्यवधी रूपयांचा असून, यात शिक्षण संचालक तसेच विभागीय आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून पालवेच्या मुसक्या आवळल्यास मोठे फसवणुकीचे रॅकेट पुढे येऊ शकते.१८ लाख रुपये घेऊन दिली बोगस आॅर्डरआज मी पालवेविरूध्द रीतसर तक्रार दिली, मात्र अन्य फसवणूकग्रस्त देण्यास धजावत नाहीत. माझ्याकडून रोख १८ लाख रूपये शिक्षकांची नोकरी देण्यासाठी घेतले होते. आणि मला दिलेली आॅर्डर देखील बनावट असल्याचे चौकशी केल्यावर दिसून आले. मी वाळूज येथील जिजामाता बालक मंदिरमध्ये दोन ते तीन वर्षे नोकरी केली.वेतनपत्रक तसेच हजेरी रजिस्टरही दर तीन महिन्यांना बदलले जात होते, हे माझ्या लक्षात आल्यावर आपण उर्वरित दोन लाख रूपये पालवेला दिले नसल्याचे वाघ यांनी निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकjobनोकरीJalna S Pपोलीस अधीक्षक, जालना