शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST

फोटो क्रमांक - ०९ जेएनपीएच ०७ चौधरीनगर परिसरातील घटना; पंच न आल्यामुळे दीड तास मृतदेह जागेवर जालना : ...

फोटो क्रमांक - ०९ जेएनपीएच ०७

चौधरीनगर परिसरातील घटना; पंच न आल्यामुळे दीड तास मृतदेह जागेवर

जालना : शहरातील चौधरीनगर परिसरात एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. महिलेची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौधरीनगर परिसरात मंगळवारी दुपारी एका इसमाला डी. मार्टसमोरील आडरानात महिलेचा मृतदेह दिसला. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेच्या अंगावर आणि डोक्यावर वार केल्याचे दिसून आले. महिला विवस्त्र होती. महिलेजवळ सोन्याची पोत, बिडी आढळून आली आहे. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने नमुने घेतले आहेत. दरम्यान, सरकारी पंच न आल्यामुळे पोलिसांना पंचनामा करता आला नाही. जवळपास दोन ते अडीच तास मृतदेह जागेवरच होता. पंच आल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी जालना तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. मयत महिलेची ओळख पटली नसून, पोलीस तपास करीत आहेत. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक बागूल यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्या.

अत्याचार करून खून केल्याचा संशय; मृतदेहाजवळ सापडले तिकीट

सदरील महिलेला मारहाण करण्यात आली आहे. डोक्यावर व तोंडावर जखमा दिसून आल्या आहेत. महिलेचा मृतदेह विवस्त्र असल्याने महिलेवर अत्याचार करून गळा दाबून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, महिलेच्या मृतदेहाजवळ बसचे तिकीट सापडले आहे; परंतु तिकिटावरील नावे दिसत नाहीत.