रक्तरंजित पहाटेने अंबडमध्ये खळबळ, ३६ वर्षीय युवकाचा घरासमोरच खून

By विजय मुंडे  | Updated: October 24, 2022 11:56 IST2022-10-24T11:56:00+5:302022-10-24T11:56:13+5:30

या प्रकरणाचा विविध बाजूंनी तपास केला जात असून, खुनाचे कारण अद्याप समोर आले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Bloody morning shocks Ambad, 36-year-old youth was killed in front of his house | रक्तरंजित पहाटेने अंबडमध्ये खळबळ, ३६ वर्षीय युवकाचा घरासमोरच खून

रक्तरंजित पहाटेने अंबडमध्ये खळबळ, ३६ वर्षीय युवकाचा घरासमोरच खून

अंबड (जि.जालना) : शहरातील होळकरनगर भागात एका ३६ वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना सोमवारी पहाटे समोर आली. एकीकडे दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनाची पहाट सर्वत्र उत्साहात साजरी होत असताना अंबड शहर मात्र या रक्तरंजित घटनेमुळे हादरून गेले आहे.

राजेंद्र विठ्ठलराव भोरे (३६) असे मयत युवकाचे नाव आहे. राजेंद्र भोरे हा एका औषधी दुकानावर कामाला होता. राजेंद्र भोरे याचा मृतदेह सोमवारी पहाटेच्या सुमारास त्याच्या घराजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मयताच्या पोटावर, पाठीवर, डाव्या हातावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळून आल्याचे पोनि. शिरीष हुंबे यांनी सांगितले. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. मयताच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. 

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे, सपोनि. सोमनाथ नरके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेवून पाहणी केली. या प्रकरणाचा विविध बाजूंनी तपास केला जात असून, खुनाचे कारण अद्याप समोर आले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Bloody morning shocks Ambad, 36-year-old youth was killed in front of his house