शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात रक्ताचा सडा! तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; ४ राऊंड फायर केल्याने शहर हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 13:18 IST

दहशत की सूड? जालन्यात पुन्हा गुन्हेगारांचे डोके वर; गावठी कट्ट्यातून ४ राऊंड फायर

जालना: जालना शहरातील अतिशय वर्दळीचा भाग असलेल्या नूतन वसाहत परिसरात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास थरकाप उडवणारी घटना घडली. एका खासगी बालरुग्णालयासमोर अज्ञात हल्लेखोरांनी चरण रायमलू (वय २७) या तरुणाच्या डोक्यात गावठी पिस्तुलातून ३ ते ४ गोळ्या झाडून त्याची हत्या केली. भररस्त्यात झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नेमका घटनाक्रम काय? कैकाडी मोहल्ला येथील रहिवासी असलेला चरण रायमलू शुक्रवारी रात्री आपल्या दुचाकीवरून जिल्हा सामान्य रुग्णालयाकडील रस्त्याने जात होता. तो एका बालरुग्णालयासमोर पोहोचला असता, दुचाकीवरून आलेल्या दोन ते तीन हल्लेखोरांनी त्याला अडवले. काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी पिस्तूल काढून चरणच्या डोक्यावर रोखले आणि एकामागून एक ३ ते ४ गोळ्या झाडल्या. गोळ्या थेट डोक्यात घुसल्याने चरण रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला.

पोलिसांची धाव अन् तपास सुरू घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तातडीने चरणला खासगी रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून, तपासासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

शवविच्छेदनासाठी मृतदेह छत्रपती संभाजीनगरलामृत चरणच्या डोक्यात गोळ्या अडकलेल्या असल्याने 'इन कॅमेरा' शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हत्येचे कारण अद्याप समोर आले नसले तरी जुन्या वादातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण असून पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna Shaken: Young Man Brutally Murdered in Broad Daylight Shooting

Web Summary : In Jalna, a 27-year-old man, Charan Raymalu, was shot dead near a hospital. Assailants on a motorcycle fired multiple rounds into his head. Police are investigating the murder, suspecting old disputes as the motive. The incident has created fear in the city.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना