ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:35 IST2019-01-03T00:35:21+5:302019-01-03T00:35:33+5:30
उसाने भरलेल्या ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परतूर ते वाटूर मार्गावर घडली.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : उसाने भरलेल्या ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परतूर ते वाटूर मार्गावर घडली.
लक्ष्मण सोपान देशमुख (३२) असे मयताचे नाव आहे. परतूर तालूक्यातील श्रीष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले अरोग्यसेवक लक्ष्मण सोपान देशमुख रा. वायाळ पांगरी हे बुधवारी श्रीष्टी येथून वाटूर परतूर मार्गे दुचाकीने गावी चालले होते. तर उसाने भरलेला ट्रक क्रमांक एम. एच. २० डब्लू ८४६२ परतूर कडून वाटूर कडे येत होता. वडगाव पाटीजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिली. ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने लक्ष्मण देशमुख हे जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, असा परिवार आहे. परतूर येथील ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.