भोकरदनमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीवरील तरुणास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 18:37 IST2021-08-27T18:37:22+5:302021-08-27T18:37:42+5:30
कुटुंबाच्या मदतीसाठी तरुण पंक्चर दुरुस्तीचे काम करत असे

भोकरदनमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीवरील तरुणास चिरडले
भोकरदन : पंचायत समितीत कार्यालयासमोर आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने एका तरुणास चिरडल्याची घटना घडली. अनिल शिवाजी जाधव ( २७ , फत्तेपुर ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
या बाबतची माहिती अशी की, अनिल जाधव हा पंचायत समितीत कार्यालयाजवळील अमोल दौड यांच्या दुकानात मागील दोन वर्षांपासून टायर पंक्चर दुरुस्तीचे काम करत असे. आज सकाळी अनिल शहरात एका वाहनाच्या चाकाची ट्यूब आणण्यासाठी आला होता. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ट्यूब घेऊन परतत जालन्याहून भोकरदनकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने ( एपी 16.टी यु 0443 ) त्याला चिरडले. अंगावरून ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.