भोकरदन पोलिसांनी ४० जणांना दिली तंबी; गर्दीवर बसला लगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 23:57 IST2020-03-24T23:56:43+5:302020-03-24T23:57:22+5:30
संचारबंदी असतानाही रस्त्यावर गर्दी करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी मंगळवारी चांगलाच चोप दिला.

भोकरदन पोलिसांनी ४० जणांना दिली तंबी; गर्दीवर बसला लगाम
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : संचारबंदी असतानाही रस्त्यावर गर्दी करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी मंगळवारी चांगलाच चोप दिला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, पो.नि. दशरथ चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील विविध मार्गावर बंदोबस्त लावल्याने गर्दीवर लगाम लागला होता.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, कर्मचारी डी़ जे़ शिंदे व इतर कर्मचा-यांनी शहरात जवळपास ४० जणांना पकडून चांगलीच समज दिली. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात दुपारपर्यंत बसवून ठेवण्यात आले. घराबाहेर पडण्याचे नेमके कारण काय, याबाबत लेखी घेतल्यावर त्यांना सोडण्यात आले. तर काही हुज्जत घालणा-यांना चांगला चोप देण्यात आला आहे. काही जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.