माधवानंद महाराजांच्या उपस्थितीत भागवत कथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:43 IST2019-01-06T00:43:27+5:302019-01-06T00:43:48+5:30
चिन्यमयमूर्ती संस्थान उमरखेड. (जि. यवतमाळ) येथील मठाधिपती प.पु. माधवानंद गुरू वामनानंद यांच्या उपस्थितीत जालन्यातील बजरंग दालमिलमध्ये ७ ते १९ जानेवारी दरम्यान भागवत कथेसह अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

माधवानंद महाराजांच्या उपस्थितीत भागवत कथा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : चिन्यमयमूर्ती संस्थान उमरखेड. (जि. यवतमाळ) येथील मठाधिपती प.पु. माधवानंद गुरू वामनानंद यांच्या उपस्थितीत जालन्यातील बजरंग दालमिलमध्ये ७ ते १९ जानेवारी दरम्यान भागवत कथेसह अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचवेळी प.पु. माधवानंद महाराजांचा अभिष्टचिंतन सोहळाही पार पडणारआहे.
७ जानेवारीला दुपारी ३ वाजता प.पु. माधवानंद महाराजांची शोभायात्रा काढण्यात येणार असून, ही शोभायात्रा जुना जालना भागातील पाठक मंगल कार्यालयातून निघणार आहे. तत्पपूर्वी पाठक मंगल कार्यालयातच माधवानंद महाराजांचा मुकूट प्रदान कार्यक्रम होणार आहे.
८ जानेवारी दुपारी १२ वाजता विश्वंभर दर्शन दुपारी एक ते ४ महाप्रसाद तसेच गुरूवारी १० जानेवारी पासून भागवताचार्य योगेश्वर महाराज देशपांडे - पिंपळनेरकर यांचे दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत भागवत कथा होणार आहे. तर १७ जानेवारीला हंम्पी येथील जगत्गुरू शंकराचार्य भारती स्वामी यांचे आगमन होणार असून, त्यांचेही स्वागत भव्य शोभायात्रेने करण्यात येणार आहे.
१८ जानेवारीला प.पु. माधवानंद महाराजांची सकाळी ७ सात वाजता भैंमस्थीशांतीचा कार्यक्रम होणार असून, यासाठी पैठण येथील आचार्य दत्तगुरू पोहेकर यांची उपस्थिती राहणार आहे. शंकराचार्यांच्या उपस्थितीत माधवानंद महाराजांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संतपजून सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यात नाना महाराज संस्थान लोणी, चिदबरेश्वर महाराज साखरे - आळंदी, यज्ञेश्वर महाराज - सोनई, मोहदास महाराज, नरहरी संस्थान देऊळगावराजा, कपिल शास्त्री कविश्वर - लोणी संस्थान गुळवणी पुणे, शेष महाराज गोंदीकर, भगवान महाराज आनंदगडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आाहे. या कार्यक्रात त्र्यंबक कुलकर्णी, बंडू गुरू, मोहन गुरू, पंकज गुरू, तुकाराम गुरू, रामकृष्ण गुरू, दिनेश गुरू, राजेश्वर महाराज, तुकाराम जहागिदार, अरूण जोशी, चंद्रकांत जोशी, अॅड. रमेश कणकदंडे, अण्णासाहेब राजापुरकर या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.