शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करून हातपाय बांधले अन् कालव्यात फेकले; 'तो' मृतदेह निघाला एका शेतकऱ्याचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:23 IST

शेतात गेले अन् परतलेच नाही; हातपाय बांधून कालव्यात फेकलेल्या मृतदेहाची ओळख पटली

मंठा (जि. जालना): जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पाटोदा शिवारात २६ मार्च रोजी निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. हा मृतदेह विडोळी (ता. मंठा) येथील किसन बाबासाहेब अवचार यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. मृताचे हातपाय दोरीने बांधलेले होते आणि त्यांच्या अंगावर व गुप्तांगावर गंभीर जखमा होत्या, ज्यामुळे ही हत्या अत्यंत क्रूरपणे केल्याचे समोर आले आहे.

मंठा पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

शेतात गेले अन् घातपात झालाकिसन अवचार हे व्यवसायाने शेतकरी होते आणि बहुतांश वेळ शेतातच कामासाठी थांबत असत. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ते शेतात जातो असे सांगून घरातून निघाले, मात्र ते पुन्हा परतलेच नाही. २६ मार्च रोजी दुपारी पाटोदा शिवारातील कालव्यात एका पुरुषाचा मृतदेह तरंगताना नागरिकांना दिसला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता, हा घातपाताचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले होते.

पोलिसांच्या प्रयत्नांना यशगेल्या पाच दिवसांपासून पोलीस उपविभागीय अधिकारी रामेश्वर रेंगे आणि पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नीलेश ईधाटे, संतोष माळगे व त्यांच्या पथकाने मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर रविवारी हा मृतदेह किसन अवचार यांचाच असल्याची खात्री नातेवाईकांनी केली. या भीषण हत्येमागील कारण काय? आणि ही हत्या कोणी केली? या दिशेने आता पोलीस तपास करत आहेत.

विडोळी गावावर शोककळाएक कष्टाळू शेतकरी म्हणून ओळख असलेल्या किसन अवचार यांची अशा प्रकारे निर्घृण हत्या झाल्याने विडोळी गावात संताप आणि भीतीचे वातावरण आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. पोलिसांनी संशयास्पद मोबाईल कॉल्स आणि जुन्या वादांच्या अनुषंगाने तपासाची चक्रे फिरवली असून लवकरच आरोपी जेरबंद होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer found murdered in canal; hands and feet were tied.

Web Summary : Farmer Kisan Avchar was found dead in a canal in Mantha, Jalna. His hands and feet were bound, and he had severe injuries. Police have registered a murder case and are investigating.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना