शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

गावाच्या विकासासाठी आई व्हा- पेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:30 AM

आपल्या गावाच्या विकासासाठी सरपंचाने त्या गावाची आई होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदाचे सरपंच भास्करराव पाटील यांनी मांडले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : आपल्या गावाच्या विकासासाठी सरपंचाने त्या गावाची आई होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदाचे सरपंच भास्करराव पाटील यांनी मांडले.परतूर येथे लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात स्व. बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची निवड करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आ. राजेश टोपे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव कपिल आकात, उपाध्यक्ष कुणाल आकात, प्रा. डॉ. अशोक देशमाने, प्रा. डॉ. सर्जेराव जिगे, प्रचार्य डॉ भगवान दिरंगे, डॉ. भारत खंदारे हे होते. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना सरपंच पेरे पाटील म्हणाले, सरपंचाने गावची आई होणे गरजेचे आहे. आई मुलाला खायला सर्व चांगले देते. परंतु तरीही ते मूल खात नाही. मग आई त्याला अनेक सायास करून खाऊ घालते. तसेच गावकऱ्यांना चांगले कामही रूचत नाही. ते त्यांना पटवून सांगून आपल्याला गावचा विकास करायचा असतो. मी सातवी शिकलो पण आज देशभर फिरून अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत आहे. गावात अनेक योजना राबवल्या. त्यामुळेच गावकºयांनीही माझ्यावर विश्वास टाकला. आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे केलं तर निश्चितच यश मिळते, असेही ते म्हणाले.कार्यक्रमास डॉ. संजय काळबांडे, संचालक अशोक आघाव, आसाराम लाटे, माऊली लाटे, सरपंच महेश आकात, डॉ. सुधाकर जाधव, उपप्राचार्य संभाजी तिडके, डॉ. सदाशिव मुळे, डॉ. रवी प्रधान, प्रबंधक दशरथ देवडे, सरपंच कणसे, ओंकार काटै, बद्री खवणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.खेड्यांच्या विकासात देशाचा विकास- टोपेआ. राजेश टोपे म्हणाले की, खेड्यांच्या विकासात देशाचा विकास आहे. पाण्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम शिक्षण मिळाले ेपाहिजे. कौशल्य व ज्ञान याची सांगड घालता आली पाहिजे, असेही टोपे म्हणाले. प्रास्ताविकात सभापती कपिल आकात यांनी स्व. बाबासाहेब आकात स्मृती पुरस्कार सुरू करण्यामागची पार्श्वभूमी सांगून क र्तबगार व गुणवान व्यक्तीलाच हा पुरस्कार मिळाला पाहिजे. पुरस्कार प्रदान करणारी व्यक्तीही त्याच तोडीची असली पाहिजे.नीतिमत्ता ठेवून कमवासरपंचांना खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ जुळवता येत नाही. हे करीत असताना कर वसुलीही महत्त्वाची आहे. चांगले काम करताना सर्वांनाच त्रास होतो.त्रास जास्त होऊ लागला की, समजून घ्या, आपला मार्ग बरोबर आहे. त्यामुळे काही वेळा सर्व नीतीचाही अवलंब करा मात्र आपल्या गावाचा विकास करा.

टॅग्स :sarpanchसरपंचgovernment schemeसरकारी योजनाSocialसामाजिकcivic issueनागरी समस्या