शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पारध ते धामणगाव रस्त्यावरून भाजप-शिवसेनेत श्रेयाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:40 IST

लोकसभा निवडणुकलीला अद्याप तीन महिने शिल्लक आहेत, असे असतानाच भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन/पारध : लोकसभा निवडणुकलीला अद्याप तीन महिने शिल्लक आहेत, असे असतानाच भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगली आहे. निमित्त आहे ते पारध ते धामणगाव या दोन किलोमीटर रस्ता कामाच्या डांबरी करणाचे! गुरूवारी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आ. संतोष दानवे यांच्या हस्ते पार पडले. तर शुक्रवारी याच रस्त्याचे उद्घाटन शिवसेनेचे कार्यकर्ते संजय खोतकर यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा पारध ते धामणगाव हा दोन किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्याची अत्यंत दयनयी अवस्था ही गेल्या काही वर्षापासून आहे. या संदर्भात लोकमतने वेळोवेळी आवाज उठवला होता. त्याची दखल घेऊन प्रारंभी आ. संतोष दानवे यांनी २०१८ च्या अर्थसंकल्पात या कामासाठी चार कोटी २५ लाख रूपयांची निधी मंजूर करून घेतला आणि त्याचे उद्घाटनही गुरूवारी केले.यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष राजेंद्र देशमुख, माजी सभापती परमेश्वर लोखंडे, अशोक लोखंडे, गणेश लोखंडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, या रस्त्यासह गोळेगाव, आन्वा, जळगाव सपकाळ, पारध आणि धामणगावसाठी साडेचार कोटी रूपये प्राप्त झाल्याचे आ. दानवे यांनी सांगितले.विशेष म्हणजे या रस्त्याचे काम अर्जुन खोतकरांनी करून दाखवावे असे आवाहन खा.रावसाहेब दानवे यांनी गेल्या आठवड्यात केले होते. जर हे काम स्वत: खोतकरांनी केले तर, आपण लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर वक्तव्य केले होते. त्यामुळे हे वक्तव्य शिवसेनेच्या जिव्हारी लागले. त्यांनी लगेचच दानवेंचे आव्हान स्वीकारून शुक्रवारी थेट पारध येथे जाऊन शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकरांचे बंधू संजय खोतकर, मनिष श्रीवास्तव, सुरेश तळेकर, नवनाथ दौड आदींच्या उपस्थितीत सकाळी स्वखर्चातून हे काम करण्याचे आव्हान स्वीकारून त्याचे नारळ फोडले. तसेच हे काम करण्यासाठी एक ट्रक खडीचा रस्त्यावर आणून टाकला.ही माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांना कळविताच भाजपने देखील बांधकाम विभागाच्या अभियंत्यासमोर खडीचे दोन ट्रक आणून टाकले. या दरम्यान अभियंत्यास धक्काबुक्की करून वर्क आॅर्डर दाखवा आणि नंतरच खडी टाकावी असे सांगितले. त्यामुळे वाद होऊन हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते. मात्र नंतर यात पोलिसांनी कोणती भूमिका घेतली, हे समजू शकले नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा