काळे झेंडे लावून शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:29 IST2018-12-15T00:28:00+5:302018-12-15T00:29:02+5:30

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील सकल धनगर समाजाच्या वतीने युती शासनाचा निषेध म्हणून गावातील प्रत्येक धनगर समाजाच्या घरावर काळ्या गुढ्या ऊभारून निषेध व्यक्त करण्यात आला.

The ban of the government by using black flags | काळे झेंडे लावून शासनाचा निषेध

काळे झेंडे लावून शासनाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील सकल धनगर समाजाच्या वतीने युती शासनाचा निषेध म्हणून गावातील प्रत्येक धनगर समाजाच्या घरावर काळ्या गुढ्या ऊभारून निषेध व्यक्त करण्यात आला. युती शासनाने धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट च्या बैठकीत एस टी प्रवर्गात आरक्षण देऊ आशे आश्वासन दिले होते पण आद्यपही शासनाने आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून धनगर समाजाने घरावर काळ्या गुढ्या उभारून शासनाचा निषेध केला धनगर समाजाचा सरकार विरोधी रोष हा मोठ्ठा प्रमाणात आहे.
युती सरकारने धनगर समाजाची मोठी फसवणूक केल्याची भावना धनगर समाजाच्या मनात निर्माण झाली आहे, या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा काळा सप्ताह धनगर समाजाच्या वतीने पाळण्यात येत असल्याचे धनगर संघर्ष समिती सदस्य बंटी आटोळे यांनी सांगितले.

Web Title: The ban of the government by using black flags