शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाबत लोककलेच्या माध्यमातून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

राणी उंचेगाव : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन आणि जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने भोकरदन ...

राणी उंचेगाव : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन आणि जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथील भैरव बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कलापथकामार्फत कोरोना व शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती लोककलेच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविली जात आहे. या अभियानाची सुरुवात घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथून करण्यात आली.

कोरोनाच्या काळात शासनाने केलेल्या विविध उपाययोजना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावयाची दक्षता, याबाबत लोककलेच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तालुक्यातील राणी उंचेगावसह, मच्छिंद्रनाथ चिंचोली, मानेपुरी, पानेवाडी, भायगव्हाण, तीर्थपुरी आणि राजेगाव आदी गावांमध्ये या कलापथकाद्वारे दिनांक ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान हे कार्यक्रम होणार असल्याची माहिती पथक प्रमुख रवी लोखंडे यांनी दिली. या पथकात रवी लोखंडे यांच्यासह लोककलावंत गणेश कदम, पांडू लोखंडे, धनंजय देशमुख, नारायण बडनेरे, सुरेश लोखंडे, समाधान गायकवाड, दगडू जाधव, आश्रुबा हिवाळे, संतोष हिवाळे, शेख साजू, बाबू तबडे आदी कलावंत सहभागी आहेत.

फोटो ओळी

राणी उंचेगाव येथे कलापथक सादर करताना कलावंत दिसत आहेत.