नेर येथे जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:32 IST2021-08-22T04:32:53+5:302021-08-22T04:32:53+5:30
नागपूर येथील महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, पंचायत समिती जालना, क्रांतिसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दरेगाव आणि जैवविविधता समिती सावंगी तलाव ...

नेर येथे जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत जनजागृती
नागपूर येथील महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, पंचायत समिती जालना, क्रांतिसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दरेगाव आणि जैवविविधता समिती सावंगी तलाव ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात आला. जालना तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीमध्ये जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत जाणीवजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत ग्रामस्थांशी गटचर्चा केली जात असून, गावशिवार फेरीतून विविध वनस्पतीची ओळख करून दिली जात आहे. वनस्पतींचे गुणधर्म व फायदे सांगून त्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज पटवून दिली जात आहे, तसेच जल सिंचन, पशुपक्षी यांची ओळख आणि त्यांचे संवर्धन करण्याबाबतही मार्गदर्शन केले जात आहे. यावेळी सरपंच सविता खराडे, ग्रामसेवक चिंचोले, रंधवे कमल, सुनील आहेरकर, तसेच जैवविविधता समितीचे अध्यक्ष सदस्य व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ, प्रवीण प्रशिक्षक, उषा शिंदे, गजानन गाडे, आयोध्या टेमकर, हर्षद ढवळे, नंदनी मालुसरे आदी परिश्रम घेत आहेत.