शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बालसुधारगृहात अल्पवयीन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 13:14 IST

a minor lover Attempted suicide in a juvenile detention center सदर प्रियकर मुलाची प्रकृती सुधारली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील यांनी दिली आहे.

ठळक मुद्देबालसुधारगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच प्रियकर लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून शौचालयात गेला. त्या ठिकाणी हारपिक टॉयलेट क्लिनर हे द्रव प्राशन केल्याचा संशय पोलिसांना आला.

जालना : शहरातील बालसुधारगृहात १६ वर्षीय प्रियकराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Attempted suicide of a minor lover in a juvenile detention center ) 

बदनापूर येथील अल्पवयीन प्रेमीयुगुल १९ जून रोजी मुंबई येथे पळून गेले होते. या प्रकरणी बदनापूर पोलिसांनी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. गायब झालेल्या या प्रेमीयुगुलास कल्याण रेल्वे स्थानकावर २० जून रोजी रेल्वे पोलिसांनी पकडले होते. याची माहिती बदनापूर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर दोघांनाही पोलिसांनी कल्याण येथून २२ जूनला बदनापूर येथे आणले. दरम्यान, मुलीच्या जबाबावरून प्रियकराविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रियकर अल्पवयीन असल्यामुळे त्यास न्यायालयात हजर करून मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जालना येथील शासकीय बालसुधारगृहात दाखल केले होते. 

बालसुधारगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच प्रियकर लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून शौचालयात गेला. त्या ठिकाणी हारपिक टॉयलेट क्लिनर हे द्रव प्राशन केल्याचा संशय पोलिसांना आला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयातून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आले. सदर प्रियकर मुलाची प्रकृती सुधारली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील यांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील यांच्या फिर्यादीवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल कदीम जालना पोलीस ठाण्यात प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी