Artistic idol; Jalna residents impressed | कलात्मक मूर्ती; जालनेकर भारावले

कलात्मक मूर्ती; जालनेकर भारावले

जालना : शहरात विविध सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शहरातील विविध गणेश मंडळानी आकर्षक आणि महाकाय गणेश मूर्तींची स्थापना केली आहे. तर अनेक मंडळांकडून सजीव देखाव्यांचे सादरीकरण करण्यात आले. यावर्षी शहरातील अनेक गणेश मंंडळांकडून मोठमोठ्या गणेश मूर्ती स्थापन करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. या महाकाय गणेशमूर्ती पाहून जालनेकर भारावून गेले आहेत. शिवाय गणेश मंडळाच्या वतीने सादर करण्यात येणारे देखावे पाहण्यासाठी आर.पी.रोड, शिवाजी पुतळा, काद्राबाद, गांधी चमन इ. भागांत रात्री उशिरापर्यंत भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. यावर्षी स्थापन झालेल्या गणेशमूर्ती पाहून जालनेकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

Web Title: Artistic idol; Jalna residents impressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.