स्टील कंपनीतील दुर्घटनेत भाजलेल्या आणखी एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 23:48 IST2020-03-07T23:48:14+5:302020-03-07T23:48:46+5:30
जालना औद्योगिक वसाहतीतील ओम साईराम या स्टील कंपनीत तप्त लोहरस अंगावर पडून भाजलेल्या आणखी एका कामगाराचा औरंगाबादेतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी मृत्यू झाला.

स्टील कंपनीतील दुर्घटनेत भाजलेल्या आणखी एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जालना औद्योगिक वसाहतीतील ओम साईराम या स्टील कंपनीत तप्त लोहरस अंगावर पडून भाजलेल्या आणखी एका कामगाराचा औरंगाबादेतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी मृत्यू झाला. प्रदीप राय (२४), असे मृृत कामगाराचे नाव आहे.
प्रदीप राय ९७ टक्के भाजले होते. शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या दुर्घटनेतील बळींची संख्या आठवर गेली आहे. मुज्जमील खान यांच्यावरही या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते ९६ टक्के भाजले असून, प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली.