आनंदी स्वामी महाराजांचा प्रकट दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:38 IST2018-11-20T00:38:29+5:302018-11-20T00:38:59+5:30
श्री आनंदी स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा रविवारी उत्साहात पार पडला.

आनंदी स्वामी महाराजांचा प्रकट दिन उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री आनंदी स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
सायंकाळी करण्यात आलेल्या दीपोत्सव, आतषबाजी व ढोलपथकाने भाविकांचे लक्ष वेधले. पहाटे साडेचार वाजता अभिषेक व काकड आरती, आठ वाजता भगवद् गीता सामूहिक पाठ, सकाळी दहा वाजता प्रकटदिन अध्यायाचे सामूहिक पारायण, सायंकाळी सहा वाजता दीपोत्सव पार पडला.
यावेळी शेकडो पणत्यांची आरास करण्यात आली होती. सात वाजता महाआरती झाली. आठ वाजता प्रसिद्ध गायक शंकर गिरी यांच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडला.यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती.