शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

परतूर शहरात कडकडीत बंद..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:11 AM

मराठा आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून, शनिवारी परतूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर शाळा महाविद्यालयही लवकर सोडून देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : मराठा आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून, शनिवारी परतूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर शाळा महाविद्यालयही लवकर सोडून देण्यात आली.मराठा आरक्षणासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मराठा समाज बांधवांच्यावतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. भर पावसातही हे आंदोलन करण्यात आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी विविध संघटना व पक्षांनी शनिवारी परतूर बंदचे आवाहन केले होते.या अवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी बांधवांनी कडकडीत बंद पाळला. तसेच शाळा महाविद्यालयेही लवकर सोडून देण्यात आली. त्यामुळे या आंदोलनाची व्याप्ती आता वाढत आहे. जोपर्यंत मराठा क्रांती मोर्चातील मागण्या शासन मान्य करीत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.या आंदोलनास जालना जिल्हा काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी युवक काँगे्रस पार्टी, मुस्लिम समाज, व्यापारी महा संघ, परतूर यांनी पाठिंबा देत बंदचे आवाहन केले होते.जालना : पूर्वतयारीसाठी आज बैठकजालना शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी काढण्यात येणाऱ्या मराठा ठोक मोर्चासह टप्याटप्यात होणा-या आंदोलनाबाबत जालना शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवांची रविवार सकाळी ११ वा. भाग्यनगर परिसरातील मराठा सेवा संघ कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत मोर्चाची रूपरेषा ठरविली जाणार आहे. शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी या बैठकीत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.शनिवारी जिल्ह्यातील समन्वयकांची बैठक पार पडली. या बैठकीला १००० पेक्षा जास्त युवकांची उपस्थिती होती. मंगळवारी होणाºया मोर्चात समाजाच्या नावावर मोठे झालेले आमदार, खासदार बोटचेपीची भूमिका घेत आहेत म्हणून या मोर्चात १६१ आमदार व मराठा खासदारांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. या मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन व दुसºया दिवशी सरकारी कार्यालयांना घेराव व तिस-या दिवशी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे मोर्चा समन्वय समितीने कळविले आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलन