पर्यावरण दिनानिमित्त मोजले झाडांचे वयोमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST2021-06-09T04:37:48+5:302021-06-09T04:37:48+5:30
नुकत्याच पार पडलेल्या जागितक पर्यावरण दिनानिमत्त श्रीपत यांच्या सूचनेसामर जालना शहर आणि तालुक्यातील जवळपास ४५ गावांमध्ये एक-एका युवकाने वेगवेगळ्या ...

पर्यावरण दिनानिमित्त मोजले झाडांचे वयोमान
नुकत्याच पार पडलेल्या जागितक पर्यावरण दिनानिमत्त श्रीपत यांच्या सूचनेसामर जालना शहर आणि तालुक्यातील जवळपास ४५ गावांमध्ये एक-एका युवकाने वेगवेगळ्या झाडांचे आयर्मान तपासले. त्यात अधिक वडाचे झाड हे सर्वात जास्त जुने आणि आजही मजबूत असल्याचे दिसून आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. लिंब, बाभूळ, उंबराची झोडेही बरीच वर्षे तग घरत असल्याचे सांगण्यात आले. याच दिनाचे औचित्य साधून दापोली येथील कृषी विद्यापीठाचे प्रशांत परांजपे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर तावरे यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
चौकट
यांनी घेतला सहभाग
सावता तिडक, सुभम शिंदे, पवन मगर, मक्तार शेख, शुभम माकोडे, आदिती सुरंगीकर, स्वाती तिरुखे, संदीप गायके, भीमाशंकर बोर्डे, डॉ. प्रतिभा श्रीपत, डॉ. सुजाता देवरे यांनी सहभाग घेतला होता.