लग्नाच्या काही महिन्यांनंतर पतीचा खरा चेहरा दिसला; जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

By दिपक ढोले  | Updated: August 10, 2022 18:31 IST2022-08-10T18:30:43+5:302022-08-10T18:31:02+5:30

जालना : पतीच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना जालना तालुक्यातील कारला येथे मंगळवारी घडली. अंजना ग्यानदेव ...

After a few months of marriage, the true face of the husband was revealed; Woman commits suicide due to harassment | लग्नाच्या काही महिन्यांनंतर पतीचा खरा चेहरा दिसला; जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

लग्नाच्या काही महिन्यांनंतर पतीचा खरा चेहरा दिसला; जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

जालना : पतीच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना जालना तालुक्यातील कारला येथे मंगळवारी घडली. अंजना ग्यानदेव भोकरे (२५ रा. कारला, ता. जि. जालना) असे मयत महिलेचे नाव आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरी उगळे येथील अंजना उगळे यांचा विवाह कारला येथील ग्यानदेव भोकरे यांच्यासोबत झाला होता. काही दिवस त्यांचा संसार सुखाने चालला. परंतु, त्यानंतर पती ग्यानदेव भोकरे हा अंजना भोकरे यांना मानसिक व शारीरिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून अंजना भोकरे यांनी कारला येथील परमेश्वर सरोदे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन मंगळवारी आत्महत्या केली. येथील नागरिकांनी याची माहिती मौजपुरी पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला. या प्रकरणी मयताचा भाऊ भगवान उगळे यांच्या फिर्यादीवरून संशयित ग्यानदेव सखाराम भोकरे याच्याविरुध्द मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोउपनि. नेटके हे करीत आहेत.

२२ वर्षीय तरूणीची आत्महत्या
एका २२ वर्षीय तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात घडली. पायल रमेश सोसे (२२ रा. मंठा चौफुली) असे मयत मुलीचे नाव आहे. आत्महत्या केल्याचे कळताच, नातेवाईकांनी पायलला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेको. बोडखे हे करीत आहेत.

Web Title: After a few months of marriage, the true face of the husband was revealed; Woman commits suicide due to harassment