राफेलसोबतच आदर्श घोटाळाही कळतो-दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:06 IST2018-09-18T01:06:28+5:302018-09-18T01:06:55+5:30

मला राफेल विमानांच्या आमच्या सरकारच्या खरेदीबाबत सर्व माहिती तर आहेच, परंतु चव्हाणांचा राज्यात गाजलेल्या आदर्श घोटाळ्याची देखील इत्यंभूत माहिती माझ्याजवळ आहे हे त्यांनी विसरू नये असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलतांना लगावला.

Admittedly, with Rafael, the Adarsh ​​scam knows - Danve | राफेलसोबतच आदर्श घोटाळाही कळतो-दानवे

राफेलसोबतच आदर्श घोटाळाही कळतो-दानवे

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राफेल विमान सौद्याबाबत काँग्रेसकडून जे आरोप करण्यात येत आहेत, त्यात तथ्य नसून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी जे आरोप माझ्यावर केले आहेत ते ऐकून आपण आश्चर्यचकित झालो आहोत. परंतु, अशोक चव्हाण यांना हे माहिती नाही की, मला राफेल विमानांच्या आमच्या सरकारच्या खरेदीबाबत सर्व माहिती तर आहेच, परंतु चव्हाणांचा राज्यात गाजलेल्या आदर्श घोटाळ्याची देखील इत्यंभूत माहिती माझ्याजवळ आहे हे त्यांनी विसरू नये असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलतांना लगावला.
सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव हे जालन्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी गणपती नेत्रालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अशोक चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना माझ्यावर राफेल विमान खरेदी संदर्भात दानवेंना काय कळते असा आरोप केला होता. मात्र मला राफेल तर कळतेच परंतु, आदर्श सदनिका घोटाळाही कळतो असे सांगून काँग्रेसच्या काळातच फ्रांन्सकडून जो सौदा निश्चित झाला होता. त्यात अनेक गंभीर स्वरूपाच्या त्रुटी होत्या. त्या त्रुटी आमच्या सरकारने दूर करूनच देशाचे हित लक्षात घेऊन नंतरच ही विमाने खरेदीचा निर्णय झाल्याचे दानवे म्हणाले.
येत्या आठवडाभरात महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या वृत्ताला दानवे यांनी दुजोरा दिला आहे. त्यात औरंगाबादला प्रतिनिधित्व मिळेल यावरही त्यांनी होकार दिला. मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू मिळणार काय या प्रश्नावर मात्र त्यांनी नो कमेंटस् म्हणून बोलणे टाळले. महामंडळाच्या उर्वरित नियुक्ती बाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Admittedly, with Rafael, the Adarsh ​​scam knows - Danve