अभिनेते सयाजी शिंदे अंतरवालीत; मनोज जरांगे यांची भेट घेत दिला मराठा आंदोलनास पाठिंबा 

By विजय मुंडे  | Updated: January 3, 2024 16:54 IST2024-01-03T16:53:42+5:302024-01-03T16:54:04+5:30

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत.

Actor Sayaji Shinde in antarwali sarati; He met Manoj Jarange and supported the Maratha movement | अभिनेते सयाजी शिंदे अंतरवालीत; मनोज जरांगे यांची भेट घेत दिला मराठा आंदोलनास पाठिंबा 

अभिनेते सयाजी शिंदे अंतरवालीत; मनोज जरांगे यांची भेट घेत दिला मराठा आंदोलनास पाठिंबा 

जालना- मराठी, हिंदी आणि तमिल चित्रपटातून आपल्या आभिनयाचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलीये. अभिनेते शिंदे आणि जरांगे पाटील यांच्या काही वेळ चर्चा झाली. यावेळी अभिनेते शिंदे यांनी जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनास पाठिंबा दिला.

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. येत्या 20 जानेवारी रोजी अंतरवाली ते मुंबई आरक्षणासाठी पायी दिंडी काढणार आहेत. दरम्यान, आज सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी जरांगे पाटलांची अंतरवाली येथे जाऊन भेट घेतली. अभिनेते शिंदे यांनी जरांगे पाटलांसोबत आंदोलनाच्या पुढील दिशेवर चर्चा केली. तसेच मराठा आरक्षणाच्या आंदोलनास पाठींबा दिला. 

दरम्यान, दोघांमध्ये विविध विषयांवर सुमारे तासभर चर्चा झाली.सयाजी शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला पाठिंबा दिला. मराठा आरक्षण लवकर मिळावे अशी मागणी अभिनेते शिंदे यांनी केली.

 

Web Title: Actor Sayaji Shinde in antarwali sarati; He met Manoj Jarange and supported the Maratha movement