कार्यकर्ते माझे खरे बळ : जेथलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:30 IST2019-08-29T01:30:18+5:302019-08-29T01:30:30+5:30

जे कसल्याही दडपशाहीला न घाबरता काँग्रेस पक्षाशी आजवर एकनिष्ठ राहिले, हेच कार्यकर्ते माझे खरे बळ असल्याचे प्रतिपादन माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी केले.

Activists My True Force: Jethlia | कार्यकर्ते माझे खरे बळ : जेथलिया

कार्यकर्ते माझे खरे बळ : जेथलिया

लोकमत न्यूज नेटवर्क
परतुर : गेल्या पाच वर्षांपासून आपल्या सत्तेचा गैरवापर करत भाजपा सरकारने अनेकांना दमदाटी केली आहे. तर कुणाला खोटी प्रलोभन दाखवत भाजपात खेचले आहे. मात्र त्यात जे कसल्याही दडपशाहीला न घाबरता काँग्रेस पक्षाशी आजवर एकनिष्ठ राहिले, हेच कार्यकर्ते माझे खरे बळ असल्याचे प्रतिपादन माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी केले.
परतूर येथील इंदिरा मंगल कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, कल्याण दळे, राजेंद्र राख, अन्वर देशमुख, राजेश राठोड, त्रिबंक पाबळे, दत्ता बनसोडे, किसन मोरे, अण्णासाहेब खंदारे, प्रसाद बोराडे, मोमीन खान, नीळकंठ वायाळ, बाबासाहेब गाडगे, इंद्रजित घनवट, मंजुळदास सोळंके, अयुब कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जेथलिया म्हणाले, भाजपा सरकारने सत्तेचा दुरूपयोग करत आजवर शेतकरी व सामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे. शासनाच्या अनेक जुलमी करामुळे आज अनेक कंपन्या व कारखाने बंद पडले आहेत. त्यामुळे लाखो कर्मचारी व कामगार बेरोजगार झाले आहेत. यावेळी शिवसेना व भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Activists My True Force: Jethlia