अपघातात महिला भाविकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:05 IST2019-10-01T01:04:49+5:302019-10-01T01:05:00+5:30
दुर्गामाता देवीचे दर्शन घेऊन घराकडे निघालेल्या महिला भाविकांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एका २४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला

अपघातात महिला भाविकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदनझिरा : दुर्गामाता देवीचे दर्शन घेऊन घराकडे निघालेल्या महिला भाविकांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एका २४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास जालना- औरंगाबाद महामार्गावरील त्रिमूर्ती चौकात घडली.
मनीषा वैजिनाथ दळवी (२४) असे मयत महिलेचे नाव आहे. चंदनझिरा सत्यमनगर येथील मनीषा दळवी व सीमा विनोद इंगोले या दोघी सोमवारी पहाटे दुचाकीवरून (क्र. एम.एच.२१- बी. एम. ०७१०) जालना येथील दुर्गामाता देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. देवीचे दर्शन घेऊन त्या दोघी गावाकडे परतत होत्या.