शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आजारी चिमुकल्याच्या ओढीने घराकडे परतणाऱ्या ऊसतोड मजुराचा अपघाती मृत्यू

By विजय मुंडे  | Updated: January 31, 2023 12:02 IST

पीकअप टेम्पोची दुचाकीला धडक; पत्नीसह पुतण्या गंभीर जखमी

आष्टी (जि.जालना) : आजारी असलेल्या सहा महिन्याच्या चिमुकल्यासह दोन मुलींच्या ओढीने घराकडे जाणाऱ्या ऊसतोड मजुराचा पीकअप-दुचाकीच्या अपघातातमृत्यू झाला. तर मयताच्या पत्नीसह पुतण्या गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी रात्री आष्टी- कुंभार पिंपळगाव मार्गावरील ढोकमाळ तांडा पाटीजवळ घडली.

ज्ञानेश्वर बळीराम राठोड (३०) असे मयताचे नाव आहे. तर सिंधू राठोड, बाळू बबन राठोड (तिघे रा. हास्तूर तांडा ता.परतूर) अशी जखमींची नावे आहेत. हास्तूर तांडा येथील ज्ञानेश्वर बळीराम राठोड हे ऊसतोड करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. ज्ञानेश्वर राठोड, त्यांच्या पत्नी सिंधू राठोड, पुतण्या बाळू राठोड हे सोमवारी सकाळी ऊसतोडणीच्या कामासाठी कोकाटे हादगाव येथे गेले होते. दिवसभर काम केल्यानंतर रात्री दुचाकीवरून गावाकडे परतत होते. त्यांची दुचाकी (क्र.एम.एच.१३- ए.टी. १३१९) आष्टी- कुंभार पिंपळगाव मार्गावर आली असता भरधाव बोलेरो पीकअपने (एम.एच.२१- एक्स.६५६४) जोराची धडक दिली.

अपघातानंतर तिघे जखमी रस्त्यावर विव्हळत पडले होते. परंतु, वेळेत उपचार न मिळाल्याने ज्ञानेश्वर यांचा मृत्यू झाल्याचे मधुकर राठोड यांनी सांगितले. तर सिंधू राठोड व बाळू राठोड या दोघांना परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. अपघातानंतर पीकअप चालक पळून गेला. या प्रकरणात मंगळवारी सकाळी आष्टी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळाला पोहेका पालवे, राहुल वाघमारे यांनी भेट देवून पंचनामा केला. तपास पोउपनि लव्हारे हे करीत आहेत.

दोन मुलींसह मुलावरील वडिलांचे छत्र हरवलेज्ञानेश्वर राठोड हे भूमिहिन असून, उदरनिर्वाहासाठी ते ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. त्यांना दोन मुली आणि एक सहा महिन्यांचा मुलगा आहे. लहान मुलाची तब्येत बरी नसल्याने तीन दिवसांपासून त्याला घरीच ठेवून पती-पत्नी ऊसतोडणीसाठी जात होते. परंतु, ज्ञानेश्वर राठोड यांचा अपघाती मृत्यू झाल्याने सहा महिन्यांच्या मुलासह दोन मुलींच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरवे आहे. या घटनेने हास्तूर तांडा व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघाताची मालिका सुरूपाथरी-आष्टी- कुंंभारपिंपळगाव- अंबड या मार्गाचे काम नुकताच झाले आहे. तर जालना ते परभणी महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून नांदेडहून औरंगाबादला जाणारी वाहने पाथरी ते अंबड मार्गावर येत आहेत. या मार्गावर गतीरोधक नाहीत. परिणामी भरधाव वाहनांमुळे अपघाताची मालिका सुरू झाली आहे.

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघातDeathमृत्यू