Samruddhi Mahamarg: चालकाचा ताबा सुटल्याने ‘समृद्धी’वर कार उलटली : दोघेजण जखमी
By दिपक ढोले | Updated: March 16, 2023 18:31 IST2023-03-16T18:30:50+5:302023-03-16T18:31:35+5:30
नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे.

Samruddhi Mahamarg: चालकाचा ताबा सुटल्याने ‘समृद्धी’वर कार उलटली : दोघेजण जखमी
जालना : चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटल्याची घटना मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गावरील कॉरिडॉर क्रमांक ३५७वर गुरुवारी घडली. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत.
नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गावर मागील काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरू आहे. गुरूवारी कार (क्रमांक एमएच ०६ बीयू ८८६६) भरधाव जात होती. जालना जिल्ह्याच्या हद्दीतील कॉरिडॉर क्रमांक ३५७ जवळ आल्यावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे कार उलटली. याची माहिती महामार्ग पोलिसांना देण्यात आली. महामार्गाचे सपोनि. दंडगव्हाळ, पोना. नागलोत यांनी घटनास्थळी धाव घेतली. यात राजेंद्र धुळे व अन्य एक हे किरकोळ जखमी झाले आहे. त्यांना तातडीने सिंदखेडराजा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर अपघाताची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली.