वाहनांची गती वाढल्याने अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:51 IST2019-03-05T00:50:50+5:302019-03-05T00:51:09+5:30
वाटूर - परतूर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पुर्ण होऊ लागल्याने वाहनांच्या गतीत वाढ झाली आहे. पण, अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.

वाहनांची गती वाढल्याने अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : वाटूर - परतूर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पुर्ण होऊ लागल्याने वाहनांच्या गतीत वाढ झाली आहे. पण, अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.
वाटूर- परतूर रस्त्याचे सिंमेंट काँक्रीटीकरण मागील वर्षीपासून सुरू आहे. म्हणजेच दिंडी मार्ग या रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदारांकडून वाहतूकीची काहीच काळजी घेतली जात नाही. कूठेही मटेरीयल टाकून, खोदकाम, खड्डे, दगड, खडी मनमानी पणे टाकण्यात येत आहे. यातच पाणी न मारल्याने धुळीचाही त्रास वर्षभरापासून सुरू आहे. परतूर- वाटूर दरम्यान ज्या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण होऊन या रस्त्यावर वाहतूक सुरू झाली असून वाहनांची गती वाढली आहे. रस्त्यावरून वाहने भरधाव वेगाने धावू लागली आहेत. पण, वेगाने आलेले वाहनाला बाजू घेता येत नाही. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याने आतापर्यंत दोन- तीन बळी घेतले आहेत, यामुळे अर्धवट कामाजवळ काही संकेत, खुणा करणे आवश्यक आहे.
तसेच रस्त्यावर तात्पुरते गतिरोधक उभारण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
.या रस्त्यावर वाळूचे ट्रॅक्टरही भरधाव वेगाने धावत आहेत. निम्न दुधना प्रकल्पातील पाणी खाली गेल्याने मोठ्या प्रमाणात वाळू पट्टे उघडे पडत आहेत. रात्री या पट्ट्यातून अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर या रस्त्याने भरधाव धावत आहेत. यातील विशेष म्हणजे, या ट्रॅक्टर व ट्रालीला क्रमांकही नसतो. त्यामुळे अपघात झाल्यास हे ट्रॅक्टर चालक पळून जातात. यामुळे ट्रॅक्टरला आळा घालण्याची मागणी होत आहे.