जालन्याच्या युवकाचा खून करून मृतदेह बदनापुरात फेकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 19:20 IST2023-02-13T19:19:55+5:302023-02-13T19:20:34+5:30
देवगाव फाटाजवळील एका प्लॉटिंगच्या कच्च्या रस्त्यावर आढळला मृतदेह

जालन्याच्या युवकाचा खून करून मृतदेह बदनापुरात फेकला
बदनापूर ( जालना)- शहराजवळ असलेल्या देवगाव फाटा येथे आज सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
देवगाव फाटाजवळील एका प्लॉटिंगच्या कच्च्या रस्त्यावर जालना औरंगाबाद महामार्ग लगत आज सकाळी युवकाचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळाताच बदनापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहावर अंगावर जखमा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी पाहणी करून पंचनाम्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात रवाना केला.
दरम्यान, शेख फयाज़ शेख रईस ( 22 राहणार शेर सवार नगर जालना ) येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी सय्यद अफसर सय्यद अजगर हुसेन सहाय्यक फौजदार पोलीस ठाणे बदनापूर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामोड हे करीत आहेत.