धुळे-सोलापूर महामार्गावर पाइप घेऊन जाणारा कंटेनर उलटला

By दिपक ढोले  | Updated: October 4, 2023 16:30 IST2023-10-04T16:28:04+5:302023-10-04T16:30:19+5:30

यामुळे महामार्गावर तीन तास वाहतूक ठप्प

A container carrying a pipe overturned on the Dhule-Solapur highway | धुळे-सोलापूर महामार्गावर पाइप घेऊन जाणारा कंटेनर उलटला

धुळे-सोलापूर महामार्गावर पाइप घेऊन जाणारा कंटेनर उलटला

जालना : चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगाने जाणारा कंटेनर धुळे-सोलापूर महामार्गावरील सौंदलगाव शिवारात उलटल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या अपघातामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती.

छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे पाइप घेऊन कंटेनर क्रमांक (आरजे ५१ जीए ३१०१) हे वेगाने जात होता. सौंदलगाव जवळ आल्यावर चालकाचा ताबा सुटला. त्यातच कंटेनर उलटला. या अपघातामुळे महामार्गावरील एका बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती कळताच महामार्गासह गोंदी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करण्यात आला.

Web Title: A container carrying a pipe overturned on the Dhule-Solapur highway