'निर्णय प्रक्रियेतून ओबीसींना हटविण्याचं हे षडयंत्र'; धनंजय मुंडेंच्या बाजूने हाके मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 13:05 IST2025-02-05T12:48:33+5:302025-02-05T13:05:33+5:30

धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यामागे मोठे षडयंत्र; लक्ष्मण हाके यांची अंजली दमानिया आणि मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका

'A conspiracy to exclude OBCs from the decision-making process'; Laxman Hake takes to the field in support of Dhananjay Munde | 'निर्णय प्रक्रियेतून ओबीसींना हटविण्याचं हे षडयंत्र'; धनंजय मुंडेंच्या बाजूने हाके मैदानात

'निर्णय प्रक्रियेतून ओबीसींना हटविण्याचं हे षडयंत्र'; धनंजय मुंडेंच्या बाजूने हाके मैदानात

- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : 
अंजली दमानिया यांचं नाव आता अंजली दलालिया ठेवावं. मीडियात फक्त स्पेस शोधण्याचा काम त्या करतात. त्यांना कोणीही गांभीर्याने घेऊ नये. महाराष्ट्रात अंजली दमानीया यांनी जेवढी प्रकरण उपस्थित केली त्या प्रकरणांचे पुढे काय झालं हे महाराष्ट्राला माहिती आहे. ठराविक नेत्यांची प्रकरणं उकरून काढायची आणि त्यांना राजकारणातून संपवायचं हा एककलमी कार्यक्रम या अंजलीताई दलालिया यांचा आहे, अशी सडकून टिका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली. वडीगोद्री येथे प्रसारमाध्यमांशी आज सकाळी लक्ष्मण हाके यांनी संवाद साधला. 

हाके पुढे म्हणाले, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचे राजकारणासाठी भांडवल केलं जात आहे. धनंजय देशमुख यांची पहिल्या दिवसापासून अतिशय समतोल भूमिका आहे. धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगेच्या नादाला लागू नये. जरांगे दोन वर्षापासून दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. धनंजय देशमुख यांच्या भूमिकेचा मी पहिल्या दिवशीपासून स्वागत करतोय. जरांगे यांच्या नादी धनंजय देशमुख लागले तर दुर्दैवाने या घटनेचे गांभीर्य निघून जाऊ शकतं, असेही हाके म्हणाले. तसेच एखाद्या नेतृत्वाला बदनाम केलं जात असेल त्याचा राजीनामा घेण्यासाठी प्रस्थापित व्यवस्था काम करत असेल, तर ते व्यक्त झाले यापलीकडे काय नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर हाके यांनी भूमिका जाहिर केली.

धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ओबीसी समाज
आमच्या ओबीसीच्या मंत्र्याला मीडिया ट्रायल द्वारे त्रास देण्याचे काम होत असेल तर या महाराष्ट्रातील ओबीसी आणि बहुजन बांधव ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहील. त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरेल, धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ओबीसी समाज असल्याची ग्वाही हाके यांनी सांगितले.

हाके यांची जरांगे यांच्यावर टीका
मनोज जरांगे काय बोलतात याकडे आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही. ओबीसीच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्री कसे लक्ष देतील यासाठी आम्हाला लढायचं आहे, असे हाके म्हणाले. तसेच मनोज जरांगे यांच्या पुढे कायम चॅनलचे बूम असतात. मिडियाचे बूम नाही बघितले तर मनोज जरांगेच्या डोक्यावर परिणाम होईल, अशी खोचक टीका हाके यांनी केली. तपासासाठी राज्य शासन गृह विभाग आहे, न्यायव्यवस्था आहे, न्यायव्यवस्थेवरती आमचा प्रचंड विश्वास आहे. व्यवस्था यांना मान्य नसेल तर ही एसआयटी, सीआयडी, न्यायालय बरखास्त करून या जरांगे सारख्या खुळचट माणसाला त्यावर नेमाव. तुमचा इंटरेस्ट नेमका कशात आहे.? स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्यारांना शिक्षा देण्यात की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यात इंटरेस्ट आहे? स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या आणि वाल्मीक कराड अटक झाल्यानंतर. मधला किती दिवसाचा कालावधी गेला? हे आज का उघड  केलं? असा सवाल हाके यांनी केला.

धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यामागे मोठे षडयंत्र
आज कॅबिनेटमध्ये भुजबळ साहेब नाहीत. ओबीसी आरक्षणावरती कोण ठामपणे बोलणार? त्यामुळे भूमिका घेणारी माणसं मंत्रिमंडळात पाहिजेत. धनंजय मुंडे यांना टार्गेट करणे म्हणजे निर्णय प्रक्रियेतून ओबीसी माणसं बाजूला करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप हाके यांनी केला. रोहित पवार यांचा आयटी सेल सोशल मीडिया वरती ओबीसी नेत्यांना टार्गेट करून बदनामी करण्याचं काम करतेय अशी टीका हाके यांनी रोहित पवार वर केली.

Web Title: 'A conspiracy to exclude OBCs from the decision-making process'; Laxman Hake takes to the field in support of Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.