जांबसमर्थ येथे जीपमधूून ८५ लाख रुपये जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:47 IST2019-04-04T00:46:35+5:302019-04-04T00:47:16+5:30
निवडणूक विभागाच्या पथकाने जांबसमर्थ येथै मंगळवारी दुपारी स्कॉर्पिओ गाडीची तपासणी केली. त्यात रोख ८५ लाख रूपये आढळून आले आल्याने मोठी खळबळ उडाली

जांबसमर्थ येथे जीपमधूून ८५ लाख रुपये जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : निवडणूक विभागाच्या पथकाने जांबसमर्थ येथै मंगळवारी दुपारी स्कॉर्पिओ गाडीची तपासणी केली. त्यात रोख ८५ लाख रूपये आढळून आले आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.
घनसावंगी पोलिसांनी याबाबत इन्कम टॅक्स विभागाला याची माहिती दिली असून, ही रक्कम नेमकी कोणाची आहे, आणि ती कोठून आणली होती, याचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. प्रथमदर्शनी चौकशी केली असता, सदरची रक्कम ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जालना येथील असल्याचे दिसून आले. ज्या कारमधून ही रक्कम जप्त करण्यात आली, त्यांनी ही रक्कम कोठून आणली याच्या पावत्या दाखवल्या आहेत. त्यानुसार ही रक्कम आणि गाडी देखील मध्यवर्ती बँकेची असल्याचे दिसून आले. परंतु जो पर्यंत खात्री होत नाही, तो पर्यंत ही रक्कम कोषागार कार्यालयात ठेवण्यात येणार असून, खात्री पटल्यावर संबंधितांना ती रक्कम परत केली जाईल, असे पो. निरीक्षक बंटेवाड यांनी सांगितले.