शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

७८ वीजचोरांना कारवाईचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:22 AM

वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करणाऱ्या ७८ जणांविरूध्द महावितरणच्या जालना उपकार्यकारी अभियंत्यांच्या भरारी पथकाने कारवाई केली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करणाऱ्या ७८ जणांविरूध्द महावितरणच्या जालना उपकार्यकारी अभियंत्यांच्या भरारी पथकाने कारवाई केली. जालना जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात गत दहा महिन्यांत करण्यात आलेल्या या कारवाईत १२ लाख २५५५ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.विजेची चोरी होऊ नये, यासाठी महावितरणकडून कारवाईची मोहीम राबविली जाते. शिवाय वीजचोरी होऊ नये म्हणून मीटरमध्ये बदल करून नवे मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, या नवीन मीटरलाही छेडछाड करून वीजचोरी करणाऱ्यांची कमी नाही. अशा वीज चोरांविरूध्द महावितरणचे भरारी पथक कारवाई करीत आहे. जालना येथील पथकाने गत दहा महिन्यांत जिल्ह्याच्या विविध भागात आणि इतर जिल्ह्यांतही कारवाई केली आहे. यात ७८ जणांविरूध्द केलेल्या कारवाईत तब्बल ४२ लाख २० हजार ११५ रूपयांची वीजचोरी झाल्याचे समोर आले. या कारवाईनंतर १२ लाख २ हजार ५५५ रूपयांचा दंड संबंधितांनी भरला.या पथकाने एप्रिल २०१९ मध्ये दोन कारवाया केल्या होत्या. यात ३ लाख ६८ हजार ९९० रूपयांची वीजचोरी झाल्याचे समोर आले होते. पैकी दोन्ही वीज चोरांनी रक्कम भरली आहे. मे महिन्यात झालेल्या सहा कारवायांमध्ये ६ लाख २२ हजार २८७ रूपयांची वीजचोरी समोर आली होती.पैकी तीन वीजचोरांनी ३ लाख १९ हजार ७६८ रूपयांची रक्कम जमा केली आहे. जूनमध्ये केलेल्या ९ कारवायांमध्ये ४ लाख ६२ हजार ५३२ रूपयांची वीजचोरी समोर आली होती. यातील एकाही वीजचोराने रक्कम भरलेली नाही. जुलैमध्ये झालेल्या तीन कारवायांमध्ये १ लाख ४८ हजार ४० रूपयांची वीजचोरी पकडण्यात आली होती. यातील केवळ एकाने १ लाख ८ हजार ८६० रूपयांचा भरणा केला आहे. आॅगस्ट महिन्यात झालेल्या पाच कारवायांमध्ये २ लाख ४० हजार ७२० रूपयांची वीजचोरी आढळून आली होती. सप्टेंबरमध्ये ६ कारवायांमध्ये २ लाख ३४ हजार ६५५ रूपयांची, आॅक्टोंबरमध्ये ८ कारवायांमध्ये ३ लाख ८१ हजार ७३० रूपयांची वीजचोरी समोर आली होती. या तिन्ही महिन्यांत झालेल्या कारवायांमधील वीजचोरांनी रक्कम भरलेली नाही. नोव्हेंबर महिन्यात या पथकाने तब्बल १६ ठिकाणी कारवाया करून ८ लाख ३६ हजार ८४९ रूपयांची वीजचोरी समोर आणली होती. यातील ४ जणांनी २ लाख ४६ हजार ७० रुपयांचा भरणा केला आहे. डिसेंबर महिन्यात ११ ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. यातून ३ लाख ९१ हजार ५३२ रुपयांची वीजचोरी समोर आली. तर केवळ दोघांनी १ लाख ५८ हजार ८४९ रूपयांचा भरणा केला आहे. जानेवारी २०२० मध्ये १२ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली असून, ५ लाख ३२ हजार ६८० रूपयांची वीजचोरी पकडण्यात आली. यातील एकाही वीजचोराने रक्कम भरलेली नाही.पोलीस ठाण्यात तक्रारी : तब्बल ६२ गुन्हे अद्यापही प्रलंबितभरारी पथकाने कारवाई करून वीजचोरी पकडल्यानंतर संबंधितांना रक्कम भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, ज्यांनी रक्कम भरली नाही, अशांविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल केला जातो. या पथकाने जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांकडे दिलेल्या तक्रारींपैकी तब्बल ६२ गुन्हे दाखल झालेले नाहीत. पोलीस प्रशासनाने हे गुन्हे दाखल केले नसल्याने पुढील कायदेशीर प्रक्रियाही थंडावली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.शहरात आकड्यावर आकडेजालना शहरातील काही भागात दिवसरात्र विजेची चोरी केली जात आहे. भरारी पथक मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करणा-यांवर कारवाई करीत आहे. मात्र, लाईनमनसह इतर कर्मचारी आकडे टाकून होणा-या वीजचोरीकडे दुर्लक्ष करीत आहेत. वाढलेली वीजचोरी पाहता महावितरणने वीज चोरांविरूध्द कारवाई मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.अनामत भरूनही वीजमीटर मिळेनावीज मीटर मिळावे म्हणून अनेकांनी वीजवितरण कंपनीकडे डिमांड भरले आहेत. परंतु वीज मीटर नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे वीजवितरणच्या अधिका-यांनी अनामत रक्कम भरणा-यांना मीटर द्यावेत आणि नंतरच कारवाई करावी अशी मागणी अनामत रक्कम भरणा-या ग्राहकांकडून होत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजtheftचोरी