५७ रिक्षाचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:03 IST2018-09-19T01:02:12+5:302018-09-19T01:03:19+5:30
जालना शहर वाहतूक शाखेच्यावतीने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी रिक्षा चालकांना मंगळवारपासून युनिफॉर्म घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.

५७ रिक्षाचालकांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहर वाहतूक शाखेच्यावतीने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी रिक्षा चालकांना मंगळवारपासून युनिफॉर्म घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. याअतंर्गत मंगळवारी ५७ रिक्षा चालकांवर कारवाई करुन ११ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरात रिक्षा चालक मोठ्या प्रमाणात बेशिस्तपणे वाहतुक करतात. वाहतुकीच्या नियमाचे पालन न केल्यामुळे छोटे मोठे अपघातही होतात. याला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्यावतीने रिक्षा चालकांना युनिफॉर्म घालणे बंधन कारक करण्यात आले आहे. यासाठी रिक्षा चालकांना दि. १५ सप्टेंबर पर्यंतचा कालावाधी दिला होता. त्यानुसार मंगळवारी युनिफॉर्म नसलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. दिवसभर वाहतूक पोलिसांच्या वतीने रिक्षा चालकांवर कारवाई केली. यात ५७ रिक्षा ताब्यात घेण्यात आली. तसेच ११ हजार ७०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.
दरम्यान, रिक्षा चालकांनी युनिफॉर्म घालूनच रिक्षा चालवावी व नियमांचे पालन करावे, असे वाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले.