८० गावांमधील काम ३६ कर्मचाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:44 PM2020-03-17T23:44:02+5:302020-03-17T23:44:43+5:30

मंठा शहरासह तालुका व परिसरातील ८० गावांमधील कायदा- व्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम मंठा पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी आणि ३६ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर येऊन पडले आहे

In 4 villages | ८० गावांमधील काम ३६ कर्मचाऱ्यांवर

८० गावांमधील काम ३६ कर्मचाऱ्यांवर

Next

विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मंठा शहरासह तालुका व परिसरातील ८० गावांमधील कायदा- व्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम मंठा पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी आणि ३६ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर येऊन पडले आहे. अपुरे कर्मचारी असल्याने कार्यरत अधिकारी, कर्मचा-यांना मोठी कसरत करावी लागत असून, आपत्तीच्या स्थितीत संबंधितांची मोठी धावपळ होत आहे.
जालना जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांपैकी मंठा ठाणे एक आहे. दक्षिणोत्तर ६५ किलोमीटर तर पूर्व- पश्चिम जवळपास ३७ किलोमीटरची हद्द या ठाण्यांतर्गत येते. पाच बीटमध्ये ८० गावांचा समावेश आहे. यात मंठा बीटमध्ये १३, ढोकसळ बीटमध्ये १३, खोराड सावंगी बीटमध्ये १४, पोटोदा बीटमध्ये १९ तर तळणी बीटमध्ये २१ अशी एकूण ८० गावे या ठाण्यांतर्गत येतात. राजकीय दृष्ट्या मंठ्यासह तळणी, पाटोदा ही गावे संवेदनशील आहेत.
ठाण्याच्या हद्दीतून वाहणा-या पूर्णा नदीतून होणारा अवैध वाळू उपसा, वाहतूक रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. परभणी- औरंगाबाद, बुलडाणा महामार्ग ठाण्याच्या हद्दीतून जातात. महामार्गावर होणारे अपघात, जखमींना मदत करण्याचे कामही मंठा ठाण्यात कार्यरत अधिकारी कर्मचा-यांना करावे लागते. शिवाय मोर्चे, आंदोलने, मंत्र्यांचे दौरे, बैठकांचा बंदोबस्तही आहे. सध्या मंठा ठाण्यात तीन अधिकारी आणि ३६ कर्मचारी कार्यरत आहेत. पैकी दररोज पाच कर्मचारी साप्ताहिक सुटीवर असतात. तर शिल्लक ३१ पैकी चालक, बीट, स्टेशन डायरी, कोर्ट, तहसील, समन्स, वॉरंट बजावणीसह इतर कार्यालयीन कामकाजासाठी जाणारे कर्मचारी वेगळेच! ही स्थिती पाहता ठाण्यात शिल्लक कर्मचारी राहणे मुश्किल असते. अशा स्थितीत एखाद्या गावात हाणामारी झाली, अपघात झाला किंवा आपत्ती जनक स्थिती निर्माण झाली तर कार्यरत अधिकारी, कर्मचा-यांना धावपळ करावी लागते. या कामाचा परिणाम गुन्ह्यांच्या तपासावरही होताना दिसतो. ठाण्याच्या हद्दीतील गावे आणि कर्मचाºयांची संख्या पाहता मंठा ठाण्यातील कर्मचा-यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.

Web Title: In 4 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.