वाळूची चोरटी वाहतूक करणारे ४ ट्रक पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:54 IST2019-02-26T00:53:23+5:302019-02-26T00:54:12+5:30
गोदावरी नदीतून वाळूची चोरी करुन अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या चार हायवा गोंदी पोलिसांनी रविवारी रात्री धडक कारवाई करत तब्बल सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वाळूची चोरटी वाहतूक करणारे ४ ट्रक पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड / गोंदी : येथील गोदावरी नदीतून वाळूची चोरी करुन अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या चार हायवा गोंदी पोलिसांनी रविवारी रात्री धडक कारवाई करत तब्बल सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोंदी व पाथरवाला बु. परिसरात मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक होत असल्याचे गोंदी पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी रात्री पाथरवाला मार्गावर पाळत ठेवून अवैधपणे हायवा मधून वाळू घेऊन जात असलेल्या चार हायवा एम.एच. २१ बी.एच.९२५०, एम. एच. २३, ए.व्ही. ४६८६, एम.एच. २१. बी. एच. ६०० हायवा यात एका विनाक्रमांकाचा हायवा पोलिसांनी जप्त केला.
वाळू आणि चार हायवाची तब्बल सव्वा कोटीचा मुद्देमाल असल्याचे पोलीस सांगत आहे.
पोहेकॉ अमर पोहार यांच्या फिर्यादीवरून हायवा चालक-मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईत ए.पीआय शिवानंद देवकर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, पो.कॉ. महेश तोटे, बाबा डमाळे, प्रदीप आढाव, ज्ञानेश्वर मराडे, गणेश लक्कस, योगेश दाभाडे, गणेश बुजाडे, अशोक भांगल आदींनी केली.
या कारवाईमुळे वाळू चोरांमध्ये खळबळ उडाली असल्याचे दिसून आले.