जालन्यात १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:14 IST2019-03-09T00:13:26+5:302019-03-09T00:14:27+5:30

जालना तालुक्यातील सामनगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या नेतृत्वाखाली स्थाानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी छापा मारुन धाडसी कारवाई आठ जुगाऱ्याना ताब्यात घेतले.

15 lakhs of money seized in Jalna | जालन्यात १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जालन्यात १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई : जुगाऱ्यांसाठी कारची व्यवस्था

जालना : जालना तालुक्यातील सामनगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या नेतृत्वाखाली स्थाानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी छापा मारुन धाडसी कारवाई आठ जुगाऱ्याना ताब्यात घेतले. जुगाराचे साहित्य, मोबाईल, वीस मोटरसायकल एक चारचाकी गाडी असा एकूण १४ लाख ९८ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
खबºया मार्फत माहिती मिळाल्यानुसार जालना तालुक्यातील सामनगाव शिवारातील गट क्रमांक ३६० रामेश्वर विठ्ठल खैरे यांच्या शेतात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधिक्षक ांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नियमितीच्या (पान दोनवर)
जालना : मुंबई-पुण्यालाही लाजवेल अशी व्यवस्था
सामनगाव येथे सुरू असलेल्या जुगाराच्या ठिकाणी चार राऊंड टेबल ठेवले होते. पत्ते पिसून देण्यासाठी तीन जणांची स्वतंत्र व्यवस्था केली होती. कॉईनवरही हा जुगार खेळला जात होता. दरम्यान अंदर-बाहर नावाचा जुगार मोठ्या प्रमाणावर पत्ते फेकून त्यावर पैसे लावले जात होते.
यासाठी देखील जुगार खेळणाऱ्यांची व्यवस्था केली गेली होती.मद्याच्या रिकाम्या बाटल्या तसेच जवळपास ४० पाण्याचे जार, गुटखा, सिगारटेच्या पाकिटांचा खच साचलेला दिसून आला. विशेष म्हणजे ज्यांच्या शेतात हा जुगार खेळवला जात होता. तो होमगार्ड असल्याचेही पुढे आले आहे.
रिक्षातून पोहचले पोलीस
जुगाºयांना पोलीस आल्याची माहिती कळू नये म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ग्रामस्थांसारखे वेषांतर करुन छोटा रिक्षाने जाऊन सदर जुगाºयांवर छापा टाकला. यावेळी जुगार खेळण्यासाठी येणाºयांनी प्रथम संबंधित जुगार चालविणाºयास मोबाईलवरून संपर्क करायचा, नंतर संबंधित व्यक्तीला जुगार खेळण्याच्या ठिकाणी नेण्यासाठी स्वतंत्र कारची व्यवस्था केली होती. यासाठी रामेश्वर खैरे हा मदत करत होता.

Web Title: 15 lakhs of money seized in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.