अत्याचार प्रकरणी १० वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:47 AM2018-08-07T00:47:14+5:302018-08-07T00:47:32+5:30

भोकरदन तालुक्यातील लतीफपुर येथील शेख जहीर शेख कदीर (वय ४५) याने एका मुलीला आठवडी बाजारातून पळून नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणी सोमवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप ए. घुमरे यांनी आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ३० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

10 years of imprisonment in the case of rape | अत्याचार प्रकरणी १० वर्षांची शिक्षा

अत्याचार प्रकरणी १० वर्षांची शिक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भोकरदन तालुक्यातील लतीफपुर येथील शेख जहीर शेख कदीर (वय ४५) याने एका मुलीला आठवडी बाजारातून पळून नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणी सोमवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप ए. घुमरे यांनी आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ३० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
येथील पीडित मुलगी सहा वर्षापूर्वी हसनाबादेतील आठवडी बाजारात गेली असता, आरोपीने तिला पळवून नेले. या प्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर पीडित मुलगी चार महिन्याच्या मुलासह एक वर्षांनंतर परतली. यावेळी तिने सांगितले की, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून मध्य प्रदेशमधील मगजपूर येथे डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार केला. यात आरोपीला मध्य प्रदेश मधून अटक करुन आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते, त्यावर हा निकाल देण्यात आला.

Web Title: 10 years of imprisonment in the case of rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.