शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

 झिंगाडा आमचाच! कुख्यात गँगस्टरसाठी पाकिस्तानची भारताविरोधात न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 10:08 AM

छोटा शकीलचा हस्तक आणि कुख्यात गँगस्टर मुन्ना झिंगाडावरून भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.

बँकॉक - छोटा शकीलचा हस्तक आणि कुख्यात गँगस्टर मुन्ना झिंगाडावरून भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. मुदस्सर हुसेन सय्यद ऊर्फ मुन्ना झिंगाडा हा पाकिस्तानचा नागरिक असून, त्याला आपल्याच ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी पाकिस्तानने थायलंडमधील न्यायालयात केली आहे. काही महिन्यांपूर्वी याच न्यायालयाने मुन्ना झिंगाडाचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिले होते. झिंगाडा हा पाकिस्तानी नागरिक असल्याचा पाकिस्तानचा दावा फेटाळून लावत त्याला भारताकडे सोपविण्याचे आदेश थायलंडच्या गुन्हेगारी न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात दिले होते. झिंगाडा याला थायलंडमध्ये छोटा राजनवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी थायलंड पोलिसांनी अटक केली होती. झिंगाडाला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी भारतीय तपास यंत्रणांनी केली होती. मात्र, पाकिस्तानने झिंगाडा हा पाकिस्तानी नागरिक असल्याचे सांगत त्याला पाकिस्तानच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. जानेवारी महिन्यात भारतीय पोलिसांचे एक पथक थायलंडला गेले होते. त्या पथकाने झिंगाडा हा भारतीय नागरिक असल्याचे पुरावे सादर केले होते. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान थायलंडच्या गुन्हेगारी न्यायालयाने मुन्ना झिंगाडा हा भारतीय नागरिक असल्याचे सांगितले असून त्याला भारताकडे  सोपवण्याचे आदेश दिले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारतPakistanपाकिस्तान