खूपच बेसूर गातोस, गाणं बंद कर, तक्रारीनंतर सोशल मीडिया स्टारला पोलिसांनी टाकलं तुरुंगात, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 13:30 IST2022-08-05T13:19:01+5:302022-08-05T13:30:57+5:30
Social Media Star Hero Alom: सोशल मीडिया स्टार हीरो अलोम याला त्याच्या गायनाच्या स्टाईलमुळे अडचणींचा सामना करावा लागला आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात तक्रार आल्यानंतर पकडून कोठडीत टाकले. तसेच सुमारे ८ तास चौकशी केली. एवढंच नाही तर यापुढे कधीही क्लासिकल गाणी गाऊ नकोस, अशी ताकीदही पोलिसांनी त्याला दिली.

खूपच बेसूर गातोस, गाणं बंद कर, तक्रारीनंतर सोशल मीडिया स्टारला पोलिसांनी टाकलं तुरुंगात, त्यानंतर...
ढाका - सोशल मीडिया स्टार हीरो अलोम याला त्याच्या गायनाच्या स्टाईलमुळे अडचणींचा सामना करावा लागला आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात तक्रार आल्यानंतर पकडून कोठडीत टाकले. तसेच सुमारे ८ तास चौकशी केली. एवढंच नाही तर यापुढे कधीही क्लासिकल गाणी गाऊ नकोस, अशी ताकीदही पोलिसांनी त्याला दिली. याबाबतची माहिती हीरो आलम याने पोलिसांना दिली आहे.
अलोम हा बांगलादेशमधील नागरिक आहे. फेसबुकवर त्याचे २० लाख फॉलोअर्स आहेत. तसेच त्याच्या यूट्युब चॅनलवर १४ लाखांहून अधिक सब्स्क्रायबर्स आहेत.. तो स्वत:ची ओळख गायक, अभिनेता आणि मॉडेल म्हणून करवून देतो. अलोमचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. तसेच गायनाच्या शैलीमुळे तो नेहमीच चर्चेत असतो.
मात्र गेल्या आठवड्यात त्याला गाण्यामुळे अचडणींचा सामना करावा लागला. अलोम हा खूपच बेसूर गातो आणि क्लासिकल गाण्यांची मोडतोड करतो, अशी तक्रार लोकांनी पोलिसांकडे दिली. हीरओ आलोमने दावा केला की, गेल्या आठवड्यात पोलिसांनी मानसिक दृष्ट्या माझा छळ केला. तसेच मला क्लासिकल गाणं बंद करण्यास सांगितलं. तसेच एक गायक म्हणून मी खूपच वाईट आहे, असं पोलिसांनी मला सांगितलं. शेवटी मी माफीनाम्यावर सही केली, असे अलोम याने सांगितले.
हीरो अलोम म्हणाला की, पोलिसांनी मला सकाळी ६ वाजता ताब्यात घेतले. त्यानंतर ८ तास ताब्यात ठेवले. मी रवींद्रनाथ टागोर आणि बांगलादेशचे राष्ट्रीय कवी काझी नजरुल इस्लाम यांची गाणी का गातो, असं विचारलं.
या प्रकाराबाबत ढाकाचे चीफ डिटेक्टिव्ह हारुण उर राशिद यांनी सांगितले की, आम्हाला अलोम याच्याविरोधात अनेक तक्रारी मिळाल्या होत्या. आता अलोमने आपल्या व्हिडीओमध्ये परवानगीशिवाय पोलिसांची वर्दी घातल्याप्रकरणी आणि टागोर व नजरुल यांची गाणी गायल्या प्रकरणी माफी मागितली आहे.