अमेरिकेच्या रस्त्यांवर दिसला ‘बाबा का बुलडोजर’, भारतीयांनी दिल्या योगी जिंदाबादच्या घोषणा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 02:42 PM2022-08-17T14:42:05+5:302022-08-17T14:43:10+5:30

अमेरिकेतील न्यू जर्सी येथे तिरंगा यात्रेदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 'बुलडोझर' पाहायला मिळाला.

Yogi adityanth america: 'Baba Ka Bulldozer' was seen on the roads of America, Indians gave slogans of Yogi Zindabad... | अमेरिकेच्या रस्त्यांवर दिसला ‘बाबा का बुलडोजर’, भारतीयांनी दिल्या योगी जिंदाबादच्या घोषणा...

अमेरिकेच्या रस्त्यांवर दिसला ‘बाबा का बुलडोजर’, भारतीयांनी दिल्या योगी जिंदाबादच्या घोषणा...

googlenewsNext

न्यू जर्सी: भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली, त्या पार्श्वभूमीवर या वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. 15 ऑगस्ट रोजी जगभरातील भारतीयांनी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यादरम्यान अमेरिकेतील न्यू जर्सी येथेही भारतीय समुदायाने तिरंगा यात्रा काढली. यामध्ये 'बाबा का बुलडोझर' पाहायला मिळालाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये गुन्हेगारांच्या मालमत्तेवर चालणारा बुलडोझर अमेरिकेतही लोकप्रिय झाला आहे. अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांनी बुलडोझरवर योगींचे फ्लेक्स लावून रॅली काढली.

अमेरिकेतील न्यू जर्सी येथे तिरंगा यात्रेदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 'बुलडोझर' पाहायला मिळाला. तिरंगा यात्रेदरम्यान लोकांनी बुलडोझर फिरवून स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा केला. न्यू जर्सीच्या रस्त्यांवर लोकांनी बाबांचा बुलडोझर घेऊन मोठी रॅली काढली होती. यामध्ये तेथे राहणारा भारतीय समुदाय मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यावेळी न्यू जर्सीच्या रस्त्यावर मुख्यमंत्री योगी जिंदाबाद आणि बुलडोझर बाबा जिंदाबादच्या घोषणा ऐकू आल्या. अ‍ॅडिशन टाउनशिप, न्यू जर्सी येथे मोठ्या संख्येने भारतीय राहतात. स्वातंत्र्यदिनी या सर्वांनी मिळून तिरंगा यात्रा काढली होती. अमेरिकेतील न्यू जर्सी येथे काढण्यात आलेल्या बाबाच्या बुलडोझरवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेले पोस्टर्सही लावण्यात आले होते.

Web Title: Yogi adityanth america: 'Baba Ka Bulldozer' was seen on the roads of America, Indians gave slogans of Yogi Zindabad...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.