Yes, our missiles hit Ukraine Plane, Iran confesses | होय, क्षेपणास्त्रे डागून युक्रेनचे विमान पाडले, इराणची कबुली

होय, क्षेपणास्त्रे डागून युक्रेनचे विमान पाडले, इराणची कबुली

तेहरान : येथील हवाई हद्दीतून ८ जानेवारी रोजी जाणाऱ्या युक्रेनच्या प्रवासी विमानावर आमच्या लष्कराने दोन क्षेपणास्त्रे डागली होती अशी कबुली इराणने मंगळवारी दिली. या हल्ल्याबाबत इराणने सुरू केलेल्या चौकशीतून हा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी यापुढेही सुरू राहील, असे इराणने म्हटले आहे.

या दुर्घटनेत विमानातील १७६ जण ठार झाले होते. टीओआर-एम वन या जातीच्या दोन क्षेपणास्त्रांनी हल्ला करून युक्रेनचे प्रवासी विमान पाडण्यात आले. ही क्षेपणास्त्रे लघु पल्ल्याची असून, जमिनीवरून हवेत माºयासाठी वापरली जातात. विमाने किंवा क्रूझ क्षेपणास्त्रांवर हल्ला करण्यासाठी रशियाने टीओआर-एम वन क्षेपणास्त्रांची निर्मिती केली होती. इराणने रशियाकडून २०१७ साली टीओआर- एम वन क्षेपणास्त्रांची २९ युनिट ७० कोटी डॉलरना विकत घेतली. तेहरान विमानतळावरून युक्रेनच्या प्रवासी विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते इराणी लष्कराने पाडले. (वृत्तसंस्था)

ब्लॅक बॉक्सचे गूढ
इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने ठार केल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव विलक्षण वाढला होता. त्यानंतर युक्रेनचे विमान चुकून पाडण्यात आले असे इराणने म्हटले आहे. इराण या विमानाचे ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी जिथे हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे अशा देशांत पाठविणार का, याकडेही अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Yes, our missiles hit Ukraine Plane, Iran confesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.