पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 14:17 IST2024-09-25T14:14:04+5:302024-09-25T14:17:24+5:30

WWE Ric Flair divorce: सहा वर्षांनी त्यांचा संसार मोडल्याचे फ्लेअरने जाहीर केले.

WWE legend Ric Flair announces divorce from wife Wendy Barlow after six-year marriage | पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

WWE Ric Flair divorce: वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट म्हणजेच WWEचा एकाकाळचा स्टार प्रो रेसलिंग लिजंड रिक फ्लेअरने घटस्फोटाची घोषणा केली आहे. लग्नाच्या सहा वर्षानंतर तो आणि त्याची पत्नी वेंडी बार्लो ( Wendy Barlow ) वेगळे झाले आहेत. आश्चर्यकारक बाब म्हणजे रिक फ्लेअरने वयाच्या ७५व्या वर्षी ही घोषणा केली आहे. हे त्याचे पाचवे लग्न होते. २०१८ मध्ये तो वेंडी बार्लो हिच्याशी विवाहबंधनात अडकला होता. सध्या ती ६४ वर्षांची आहे. सहा वर्षांनी त्यांचा संसार मोडल्याचे फ्लेअरने जाहीर केले.

फ्लेअरने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली- वेंडी आणि मी १३ वर्षे डेटिंग आणि लग्न अशी एकत्र घालवली. प्रत्येक जोडप्याप्रमाणे आमच्याही जीवनात चढ-उतार आले. आम्ही आदरपूर्वक वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही वेगळे होतोय हे जाणून घेणे सध्या प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. २०१७ मध्ये मी शारीरिकदृष्ट्या कठीण टप्प्यातून जात होतो. त्यावेळी तिने मला खूप मदत केली. हे आभार शब्दांत मांडणे शक्य नाही. तिचे त्यासाठी धन्यवाद. मात्र आता आमचे मार्ग वेगळे आहेत, असे फ्लेअरने लिहिले.

"वेंडी बार्लो हिने मला कठीण काळात कधीही एकटे सोडले नाही. यासाठी मी तिचा सदैव ऋणी राहीन. आम्ही सध्या वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करत आहोत. माझ्या आणि त्याच्या वेळापत्रकानुसार ते काम करणे कठीण आहे. मी तिला तिच्या प्रकल्पासाठी शुभेच्छा देतो आणि मला माहित आहे की ती देखील मला पाठिंबा देईल, असेही फ्लेअरने लिहिले.


फ्लेअरची पाच लग्नं, चार मुलं...

७५ वर्षीय फ्लेअरने सप्टेंबर २०१८ मध्ये बार्लोसोबत लग्न केले होते. जानेवारी २०२२ मध्ये हे दोघे थोड्या काळासाठी वेगळे झाले होते, परंतु अखेरीस ते पुन्हा एकत्र आले. बार्लो ही फ्लेअरची पाचवी पत्नी होती. यापूर्वी लेस्ली गुडमन, एलिझाबेथ हॅरेल, टिफनी वॅनडेमार्क आणि जॅकलिन बीम्स या चौघींशी त्याचे लग्न झाले होते. त्याला चार मुले आहेत.

Web Title: WWE legend Ric Flair announces divorce from wife Wendy Barlow after six-year marriage