शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुतीन यांनी शब्द पाळला! व्हेनेझुएलाच्या समुद्रात अण्वस्त्रधारी युद्धनौका, पाणबुडी तैनात; अमेरिकेच्या दारात रशिया-अमेरिका आमनेसामने?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 11:58 IST

Russia Venezuela Deployment, US Russia War : रशियाने आपली युद्धनौका आणि पाणबुड्या व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावर तैनात केल्या आहेत. निकोलस मादुरोच्या अटकेनंतर रशिया आणि अमेरिका थेट युद्धाच्या उंबरठ्यावर. वाचा सविस्तर.

जगावर महायुद्धाचे सावट गडद होताना दिसत आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर आता रशियाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रशियाने आपली अत्याधुनिक क्षेपणास्त्रे असलेली युद्धनौका आणि अण्वस्त्रवाहू पाणबुड्या थेट व्हेनेझुएलाच्या समुद्रात तैनात केल्या आहेत. यामुळे अमेरिकेच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर रशिया आणि अमेरिका यांच्यात थेट लष्करी संघर्षाची ठिणगी पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी मादुरो यांना फोनवरून अमेरिकेने काही आगळीक केली तर मदतीला धावून येणार असल्याचे आश्वासन दिले होते. ते आता रशिया पाळताना दिसत आहे. रशियाने आपल्या नॉर्दर्न फ्लीटमधील सर्वात शक्तीशाली युद्धनौका आणि पाणबुड्या कॅरिबियन समुद्रात धाडल्या आहेत. यामध्ये हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या युद्धनौकांचा समावेश आहे. 

अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यावर ताबा मिळवण्याच्या आणि मादुरो यांना सत्तेवरून हटवण्याच्या केलेल्या कारवाईचा हा थेट निषेध असल्याचे रशियाने म्हटले आहे. "आम्ही आमच्या मित्रराष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत," असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या कार्यालयाने दिला आहे.

अमेरिकेची धाकधूक वाढलीरशियाच्या या हालचालींमुळे पेंटागॉन (अमेरिकन संरक्षण मंत्रालय) सतर्क झाले आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा किनारपट्टीपासून रशियाच्या या युद्धनौका केवळ काही मैल अंतरावर आहेत. अमेरिकेनेही प्रत्युत्तर म्हणून आपली विमानवाहू जहाजे अटलांटिक महासागरात तैनात केली आहेत. व्हेनेझुएलातील तेल साठ्यावरून सुरू झालेला हा वाद आता जागतिक महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

शीतयुद्धाच्या आठवणी ताज्या१९६२ मधील 'क्युबन मिसाईल क्रायसिस' नंतरची ही सर्वात मोठी लष्करी तणावाची स्थिती असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रशियाने आपल्या पाणबुड्यांच्या माध्यमातून अमेरिकेच्या मुख्य भूमीला लक्ष करण्याची क्षमता दाखवून दिल्याने संपूर्ण नाटो (NATO) देशांमध्ये खळबळ उडाल्याचे वृत्त आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Putin Keeps Promise: Nuclear Warships in Venezuela; US-Russia Face-Off?

Web Summary : Russia deploys nuclear warships to Venezuela after US action against Maduro, raising tensions. Putin vowed support. The US responds by deploying aircraft carriers, escalating the crisis, reminiscent of the Cold War era. Global war looms.
टॅग्स :russiaरशियाAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिन