जगातील टॉप १० जबाबदार देशांच्या यादीत ना चीन, ना अमेरिका! भारत कितव्या स्थानावर? बघा संपूर्ण लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 20:54 IST2026-02-04T20:52:51+5:302026-02-04T20:54:19+5:30
World responsible nations index 2026 : या यादीत सिंगापूरने शासन, समाज आणि पर्यावरण या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरीबद्दल जगातील सर्वात जबाबदार देश म्हणून पहिला क्रमाकं पटकावला आहे.

जगातील टॉप १० जबाबदार देशांच्या यादीत ना चीन, ना अमेरिका! भारत कितव्या स्थानावर? बघा संपूर्ण लिस्ट
'वर्ल्ड इंटेलेक्चुअल फाउंडेशन' (WIF) ने गेल्या १९ जानेवारीला जगभरातील वाढता राजकीय तणाव, आर्थिक अस्थिरता आणि हवामान संकट या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात जबाबदार देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत सिंगापूरने शासन, समाज आणि पर्यावरण या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरीबद्दल जगातील सर्वात जबाबदार देश म्हणून पहिला क्रमाकं पटकावला आहे.
या यादीत दुसऱ्या क्रमांकार स्वित्झर्लंड, तर तिसऱ्या क्रमांक येतो डेन्मार्कचा. प्रामाणिक प्रशासन, सामाजिक सुरक्षा आणि जागतिक पातळीवरील जबाबदारीच्या जणिवेबद्दल या देशांचे कौतुक करण्यात आले. महत्वाचे म्हणजे, ही क्रमवारी आर्थिक अथवा लष्करी शक्तीवर आधारित नसून, एखादा देश आपल्या नागरिकांसाठी आणि जगाप्रती असलेली आपली जबाबदारी किती चांगल्या पद्धतीने पार पाडतो, याचा विचार करत तयार करण्यात आलेली आहे. यासाठी, प्रामाणिक आणि पारदर्शक शासन व्यवस्था. नागरिकांचे सामाजिक कल्याण, पर्यावरणाचे संरक्षण आणि जगाप्रती असलेली आपली जबाबदारी हे चार मुख्य निकष होते.
विशेष म्हणजे, अमेरिकेला (६६) आणि चीन (६८) या यादीत बरेच मागे आहेत. महत्वाचे म्हणजे, हे दोन्ही देश आर्थिक दृष्ट्या बलशाली आहेत. यावरून, केवळ पैसा अथवा शक्ती असली म्हणजे, जबाबदार असेलच असे होत नाही, हे यावरून स्पष्ट होते. याशिवाय भारताचा शेजारी असलेला पाकिस्तान या यादीत ९० व्या स्थानावर आहे. याशिवया युद्धाचा सामना करणारे सीरिया १५३ तर येमेन १५१ व्या स्थानावर आहेत.
भारत १६ व्या क्रमांकावर -
या जागतिक निर्देशांकात भारत १६ व्या स्थानावर आहे. भारताचा स्कोअर ०.५५१५ एवढा आहे. आरोग्य सेवा, सामाजिक समता आणि पर्यावरणपूरक धोरणाच्या जोरावर भारताला हा क्रमांक मिळाला. मात्र, दीर्घकालीन प्रगतीसाठी भारताला संतुलित विकास आणि सातत्यपूर्ण धोरणांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.