स्मार्टफोनवर पुरुषांच्या तुलनेत महिला पाहतात अधिक पॉर्न
By Admin | Updated: April 18, 2017 14:16 IST2017-04-18T13:42:19+5:302017-04-18T14:16:12+5:30
पुरुष हे महिलांच्या तुलनेत अधिक पॉर्न फिल्म पाहतात, असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. पण पुरुषांपेक्षा महिलाच

स्मार्टफोनवर पुरुषांच्या तुलनेत महिला पाहतात अधिक पॉर्न
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 18 - पुरुष हे महिलांच्या तुलनेत अधिक पॉर्न फिल्म पाहतात, असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. पण पुरुषांपेक्षा महिलाच पॉर्न पाहण्यासाठी अधिक उत्सुक असल्याचे एका अवहवालातून समोर आले आहे. स्मार्टफोनवर पुरुषांच्या तुलनेत महिलांकडूनच जास्त पॉर्न पाहिले जाते, असेही या अहवालात म्हटले आहे.
जगभरातील पोर्नसाइटवर 72 ट्रॅफिक हा स्मार्टफोनस टॅब आणि अन्य मोबाईलवरून येत असतो. दरम्यान, मोबाईल वरून पॉर्न पाहाणाऱ्यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असल्याचा दावा एका प्रसिद्ध पॉर्नसाईटने केला आहे. पोर्नहबने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार पुरुषांच्या तुलनेत महिला पोर्न पाहण्यामध्ये 16 टक्क्यांनी आघाडीवर आहेत.
त्याबरोबरच वाढत्यावयाबरोबरच पॉर्न पाहणाऱ्यांचा आकडाही वाढत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. 55 वर्षांहून अधिक वयाच्या महिला समवयीन पुरुषांपेक्षा 40 टक्क्यांहून अधिक पॉर्न पाहतात. तर ज्या महिलांचे वय 66 वर्षांहून अधिक आहे. अशांचे पॉर्न पाहण्याचे प्रमाण 66 टक्क्यांहून अधिक आहे.