Video: सगळे कपडे काढून फेकले अन् ओरडू लागली, २५ मिनिटं विमानात सुरू होता गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:39 IST2025-03-07T15:36:25+5:302025-03-07T15:39:03+5:30

एक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरतोय, ज्यात एक महिला नग्न होऊन आरडाओरड करतेय आणि इकडून तिकडे फिरत असल्याचे दिसतेय. 

Woman takes off all clothes on plane in Houston America video goes viral | Video: सगळे कपडे काढून फेकले अन् ओरडू लागली, २५ मिनिटं विमानात सुरू होता गोंधळ

Video: सगळे कपडे काढून फेकले अन् ओरडू लागली, २५ मिनिटं विमानात सुरू होता गोंधळ

Woman Passenger Naked Video: फिनिक्सच्या दिशेने जात असताना विमानात एका महिलेने अंगावरील सर्व कपडे काढून टाकले. त्यानंतर पुढील २५ मिनिटं तिने जे काही केलं, ते बघून प्रवाशांना धक्काच बसला. अमेरिकेत विमान उड्डाण करत असताना ही घटना घडली असून, व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत (Woman takes off all her clothes on airplane) 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अमेरिकेतली साऊथवेस्ट एअरलाईन्स कंपनीच्या एका विमानात ही घटना घडली आहे. विमानातील एका प्रवासी महिलेचा हा व्हिडीओ आला. ज्यात ती विमानातील सर्व प्रवाशांसमोर अंगावरील कपडे काढून टाकते. नग्न झाल्यानंतर ही महिला विमानात आरडाओरड करतेय आणि फिरत आहे. 

कॉकपीटचा दरवाजा वाजवू लागली

नग्न झाल्यानंतर महिला सर्व प्रवाशांमधून वैमानिकांच्या केबिनच्या दिशेने चालत गेली. त्यानंतर ती कॉकपिटचा दरवाजा वाजवू लागली. जोरजोरात दरवाजा वाजत तिने आरडाओरड केली. तिने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळही केली. उतरायचं आहे, असे ती विमानातील कर्मचाऱ्याकडे म्हणू लागली. 

याच विमानातील एका प्रवासी महिलेने १२ न्यूजला नाव न उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, जे घडले ते खूपच धक्कादायक होते. सगळेच अवाक् झाले होते. त्यानंतर ती अचानक उड्या मारू लागली. बेंबीच्या देठापासून ओरडू लागली. 

दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, ती अचानक आमच्याकडे वळली आणि तिने सगळे अंगावरील सगळे कपडे काढून फेकले. 

महिलेचे म्हणणे काय होते?

सोमवारी (३ मार्च) टेक्सासमधील ह्यूस्टन शहरातील विलियम पी. हॉबी विमानतळावरून साऊथवेस्ट एअरलाईन्सचे विमान एरिझोनातील फिनिक्सच्या दिशेने झेपावले. त्यानंतर महिलेने अचानक तिला विमानतळावर उतरायचे आहे म्हणून गोंधळ घालण्यास सुरूवात केली. 

तिच्या गोंधळामुळे विमान परत उतरवण्यात आले. ह्यूस्टनमधील हॉबी विमानतळावर उतरल्यानंतर एका कर्मचाऱ्यांने महिलेला चादरीने झाकण्याचा प्रयत्न केला. पण, तिने चादरही फेकून दिली. या महिलेला नंतर ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तिची मानसिक स्थिती व्यवस्थित आहे की नाही, तपासण्यासाठी हॅरिस हेल्थ बेन ताऊब रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

Web Title: Woman takes off all clothes on plane in Houston America video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.