त्याचे बर्थ डे सेलिब्रेशनपाहुन अनेकांचे डोळे दिपले, कुत्र्याच्या वाढदिवशी खर्च केले 'इतके' रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 19:45 IST2021-12-27T19:40:11+5:302021-12-27T19:45:06+5:30

चीनमध्ये एका कुत्र्याच्या मालकीनीने आपल्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लाखो रूपये खर्च केले आहेत. वाढदिवसाला केलेला झगमगाट पाहून तर अनेकांचे डोळे फिरले. कारण एवढा खर्च तर एखाद्याच्या लग्नातही होत नाही.

woman spends 11 Lakh rupees on dog birthday | त्याचे बर्थ डे सेलिब्रेशनपाहुन अनेकांचे डोळे दिपले, कुत्र्याच्या वाढदिवशी खर्च केले 'इतके' रुपये

त्याचे बर्थ डे सेलिब्रेशनपाहुन अनेकांचे डोळे दिपले, कुत्र्याच्या वाढदिवशी खर्च केले 'इतके' रुपये

काही माणसांचे प्रण्यांवर खूप प्रेम असते, ते त्यांची खूप चांगली काळजी घेतात, त्यांना स्पेशल फील व्हावे यासाठी पैशांचा विचार करत नाही, पाण्यासारखा पैसा खर्च करतात. चीनमध्ये एका कुत्र्याच्या मालकीनीने आपल्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लाखो रूपये खर्च केले आहेत. वाढदिवसाला केलेला झगमगाट पाहून तर अनेकांचे डोळे फिरले. कारण एवढा खर्च तर एखाद्याच्या लग्नातही होत नाही.

एवढा दिमाखदार वाढदिवस साजरा केलेल्याा कुत्र्याचे नाव डाऊ डाऊ आहे. तो चीनच्या हुनान भागातील आहे. या मालकीनीचे या कुत्र्यावर इतके प्रेम आहे, की त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या मालकीनीने तब्बल ११ लाख रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे या कुत्र्याच्या वाढदिवसाची फक्त चीनमध्येच नाही तर जगभर चर्चा आहे.

या मालकिनीने कुत्र्याच्या वाढदिवसादिवशी ड्रोन शो केला होता. या ड्रोन शो मध्ये तब्बल ५२० ड्रोनचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. या ड्रोनच्या माध्यमातून आकाशात हॅपी बर्थडे डाऊ डाऊ लिहण्यात आले होते. जन्मदिवस साजरा करताना हा व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड केला होता. त्यानंतरच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कुत्र्याच्या मालकिनीने वाढदिवसादिवशी कुत्र्यासाठी स्पेशल ड्रेस तयार केला होता. असे ड्रोन मोठमोठ्या लग्नात दिसून येतात मात्र कुत्र्याच्या वाढदिवसाला अशी तयारी पाहून लोकही आश्चर्यचकीत झाले. कारण लोकांनी कुत्र्यांच्या वाढदिवसाला कदाचित पहिल्यांदाच इतके ड्रोन पाहिले असतील. कुत्र्यांच्या मालकीनीने किमान तीस मिनिटे हा ड्रोन शो चालला पाहिजे अशा सूचना ड्रोन कंपनीला दिल्या होत्या. यावेळी वाढदिवसाला हॅपी बर्थडे सॉन्गही कुत्र्याच्या आवाजात रेकॉर्ड केले होते.

Web Title: woman spends 11 Lakh rupees on dog birthday