डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी व इम्रान खान यांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 03:42 IST2019-09-18T03:42:19+5:302019-09-18T03:42:53+5:30

भारत व पाकिस्तानमधील तणाव आता काही प्रमाणात निवळला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व इम्रान खान यांची मी लवकरच भेट घेणार

Will meet Donald Trump, Narendra Modi and Imran Khan | डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी व इम्रान खान यांना भेटणार

डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी व इम्रान खान यांना भेटणार

वॉशिंग्टन : भारत व पाकिस्तानमधील तणाव आता काही प्रमाणात निवळला असून पंतप्रधान नरेंद्र मोदीइम्रान खान यांची मी लवकरच भेट घेणार आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ह्युस्टन इथे २२ सप्टेंबर रोजी आयोजिण्यात आलेल्या ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदींसह सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला ५० हजार लोक उपस्थित राहाणार असून त्यावेळी या दोन्ही नेत्यांची भाषणे होतील. संयुक्त राष्ट्रांची आमसभा न्यूयॉर्कमध्ये या महिन्याच्या अखेरीस होणार असून त्या पार्श्वभूमीवर इम्रान खान व ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता आहे. ‘हाऊदी मोदी' कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ट्रम्प ओहियोचा दौरा करतील.

Web Title: Will meet Donald Trump, Narendra Modi and Imran Khan